शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 स्त्री समानतेसाठी ‘सेक्स स्ट्राईक’चा मार्ग अवलंबणे हा विरोधाभास ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 07:00 IST

अभिनेत्री एलिसा मिलानोने अमेरिकेत सुरू केलेली ‘सेक्स स्ट्राईक’ ची मोहीम सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

ठळक मुद्दे गर्भपात करणं किंवा न करणं पूर्णत: स्त्रियांचे स्वातंत्र्यगर्भपात विषयक कायदा हा स्त्रियांच्या बाजूने असावा ‘गर्भपात’ कायद्यानुसार वीस आठवड्यानंतर गर्भपाताला बंदी

पुणे : लिंगभेद मिटवण्यासाठी एकदम टोक गाठले तर भेद कमी न होता ही दरी अधिक वाढत जाईल. स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवताना आपण स्त्रीवादाच्या नावाखाली नक्की काय मिळवू पाहतोय याची पडताळणी करायला हवी आहे. जोडीदार समंजस असेल, तिच्या शरीरावर हक्क गाजवणारा नसेल तर त्याच्यावर हा अत्याचार नाही का? असा सवाल ‘सेक्स स्ट्राईक’ चळवळीबाबत जेंडर विषयक अभ्यासकांनी उपस्थित केला आहे . 

अभिनेत्री एलिसा मिलानोने अमेरिकेत सुरू केलेली ‘सेक्स स्ट्राईक’ ची मोहीम सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ’गर्भपात’ हा त्या मोहिमेचा मूळ गाभा आहे. गर्भपात विषयक कायदा हा स्त्रियांच्या बाजूने असावा आणि त्यांना योग्य तो अधिकार देणारा असावा हे जोवर होत नाही तोवर महिलांनी शारीरिक संबंध ठेवू नका अशा तिच्या आवाहनानं समस्त जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमेरिकेतील जॉर्जिया मध्ये गर्भारपणादरम्यान जेव्हा भ्रूणाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात त्यानंतर स्त्रियांना गर्भपात करता येणार नाही असा कायदा आणला जात आहे. हा कायदा महिलांसाठी जाचक असल्याने तिने आवाज उठविला आहे. या कायद्यावरून जगभरात विचारमंथन सुरू झाले आहे. हा कायदा स्त्रियांच्या गर्भपाताच्या अधिकारावर गदा आणणारा आहे हे मान्य केले जात असले तरी ‘सेक्स स्ट्राईक’ ला विरोध दर्शविण्यात आला आहे. या चळवळीबददल  जेंडर विषयक अभ्यासक सानिया भालेराव यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.     त्या म्हणाल्या, गर्भपात करणं किंवा न करणं पूर्णत: स्त्रियांचे स्वातंत्र्य आहे. सहाव्या आठवड्यात ( दिड महिन्यात) भ्रूणाच्या हदयाचे ठोके ऐकू येऊ लागतात. पण कित्येकदा स्त्रियांना आपण गरोदरअसल्याचं सहा आठवड्यापर्यंत कळतच नाही. मूल नऊ महिने गर्भात वाढवायचे कि नाही हा  अंतिम अधिकार तिचाच असला पाहिजे. यात दुमत नाहीच. मात्र  गर्भपात विरोधक कायद्यात बदल घडावे म्हणून, स्त्रियांना समानता मिळावी हा हेतू साध्य करण्यासाठी सेक्स स्ट्राईकचा मार्ग अवलंबणं हा विरोधाभास वाटतो. हा मार्ग फेमिनिझमच्या मूळ संकल्पनेच्या एकदम विरोधातला आहे.जगातल्या प्रत्येक स्त्रीने आपल्या जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवणं बंद करून हा प्रश्न सुटणार आहे का? अशा टोकाच्या भूमिका स्त्री पुरुष समानता मानणा-या असूच शकत नाही. एकतर सगळ्या पुरुषांना एकाच तराजूत तोलणं ही मुळात चुकीची गोष्ट आहे.एकाला अधिकार मिळण्यासाठी दुस-याकडून तो ओरबाडून घेतला तर समानता येईल कशी? याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.   
    महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सहा आठवड्यात नाही तर मग  ‘गर्भपात’ कधी करायचा?  असा सवालच उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, आपल्याकडे  ‘गर्भपात’ कायद्यानुसार वीस आठवड्यानंतर गर्भपाताला बंदी घातली आहे.  ‘गर्भपात’ हा स्त्रियांचा अधिकार आहे. स्त्रियांना बारा आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास परवानगी आहे. त्यानंतर काही विशिष्ट्य कारणांकरिता वीस आठवड्यापर्यंत गर्भपाताला मान्यता मिळू शकते.  मात्र त्यासाठी दोन डॉक्टरांची मते गृहीत धरली जातात. स्त्रियांवर मातृत्व लादणे पूर्णत: चुकीचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेAbortionगर्भपातWomenमहिला