शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

महापालिकेला ठेकेदारांचा विळखा

By admin | Updated: April 1, 2015 03:03 IST

विकासनिधीचे वाटप वॉर्डातील गरजेनुसार नव्हे तर ठेकेदारांच्या मागणीप्रमाणे होत असल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला आहे़

मुंबई: विकासनिधीचे वाटप वॉर्डातील गरजेनुसार नव्हे तर ठेकेदारांच्या मागणीप्रमाणे होत असल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला आहे़ यामुळे पालिकेतील आर्थिक व्यवहारांबाबत संशयाचे धुके दाटू लागले आहे़ अशा टक्केवारीकडे एखाद्या नगरसेवकाने बोट दाखविण्याची ही पहिलीच वेळ नाही़ परंतु या प्रकरणामुळे ठेकेदारच पालिका चालवित असल्याचा आरोप आता विरोधी पक्षातून होऊ लागला आहे़ टक्केवारीचे संभाषण जनतेपुढे आल्यानंतर महापालिकेला ठेकेदारांचा विळखा पडल्याचीच चर्चा सध्या रंगते आहे. नगरसेवकांबरोबर संगनमत करून सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टर वॉर्डस्तरावरील छोट्या-मोठ्या कामांचे कंत्राट मिळवितात, असा आरोप तीन वर्षांपूर्वी मुख्य लेखापाल यांनी केला होता़ ठेकेदारांची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आयुक्त सीताराम कुंटे यांनी ई-निविदा प्रक्रिया आणली़ परंतु तेथेही ठेकेदारांनी खर्चापेक्षा निम्म्या किमतीच्या निविदा भरून ई-निविदा प्रक्रियेत अडथळे आणले़ काही वॉर्डांमध्ये रात्रीच्या वेळेत लिंक ब्लॉक करून ठरावीक ठेकेदारांनी निविदा भरल्याचे प्रकरण गेल्यावर्षी उजेडात आले़ सुमारे शंभर कोटींच्या या ई-निविदा घोटाळ्याची चौकशी झाली़ २२ अधिकारी आणि ४० ठेकेदारांना याप्रकरणी निलंबितही करण्यात आले़ पालिकेचे कंत्राट ठरावीक ठेकेदारांना मिळण्यासाठी ठेकेदारांचे सिंडिकेटही तयार झाले आहे़ याबाबत अनेक वेळा स्थायी समितीमध्ये चर्चा झाली़ मात्र चौकशीचे आदेश देण्याचे धाडस सत्ताधारी शिवसेना-भाजपाने अद्याप दाखविलेले नाही़ त्यामुळे सत्ताधारीच या टक्केवारीच्या व्यवहाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे़ (प्रतिनिधी)