शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

जलयुक्त शिवार अभियान योजनेचे कंत्राटीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 3:04 AM

पारदर्शकतेचा अभाव; युनिक फाउंडेशनने ११0 गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन केलेल्या अभ्यासातील निरीक्षणे

- योगेश बिडवईमुंबई : पुण्यातील ‘द युनिक फाउंडेशन’ या संशोधन संस्थेने जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्यातील विविध विभागांत केलेल्या अभ्यासात या योजनेचे कंत्राटीकरण झाल्याचे आढळले आहे. या योजनेत प्रशासन आणि कंत्राटदार यांचा महत्त्वाचा हस्तक्षेप आढळला आहे. लोकजागृती, जलसाक्षरता, लोकवर्गणी वगळता इतर बाबींमध्ये गावकऱ्यांना निर्णयाचा कोणताही अधिकार नसल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचा फेरआढावा घेण्याचे ठरविले असताना या अभ्यासातील निरीक्षणे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयोगी ठरणाºया आहेत. संस्थेकडून राज्यातील २५ तालुक्यांतील ११0 गावांना भेटी देण्यात आल्या. त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील ४, मराठवाड्यातील ३ व विदर्भातील २ अशा ९ गावांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून गावे दुष्काळमुक्त न होण्यामागील अनेक वास्तव तथ्ये समोर आली आहेत. सार्वजनिक हिताच्या योजनेत हितसंबंधांना प्राधान्य मिळाल्यानंतर कंत्राटदार व मोठे शेतकरी यांनाच त्याचा लाभ मिळतो, असेही या अभ्यासातून पुढे आले आहे. वाफगाव (पुणे), टाकरवन (बीड), सोनखांब (नागपूर) व येडशी (उस्मानाबाद) येथील गावकऱ्यांनी केलेल्या सूचना कंत्राटदारांनी धुडकावून लावल्या. वाफगावकरांनी तर कामे निकृष्ट झाल्याचे वारंवार सांगितले. त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र समितीच्या सदस्यांमध्येच ज्यांनी कामे केली, त्यांचा समावेश करण्यात आला. अनेक ठिकाणी चार पट पैसे खर्च झाल्याचे लोकांनी सांगितले.रचनेच्या आणि अंमलबजावणीच्या पातळीवर ही योजना फसलेली दिसते. अंमलबजावणी करताना ‘माथा ते पायथा’ तत्त्वास मूठमाती देण्यात आली. माथ्याऐवजी पायथ्याकडून कामे झाल्याने पायथ्याच्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे केंद्रीकरण झाले. योजनेचे कंत्राटीकरण झाल्याचे दिसून आले. मशीनच्या अतिवापरामुळे अनेक गावांमध्ये कंत्राटदार आणि स्थानिक प्रशासनाने गावकºयांचे श्रमदान आणि त्यांचा सहभाग घडू दिला नाही. कंत्राटदारांचे आर्थिक हितसंबंध स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक प्रशासनाशी जोडलेले दिसून आले.- विवेक घोटाळे (कार्यकारी संचालक) व सोमिनाथ घोळवे (संशोधक), द युनिक फाउंडेशन, पुणेप्रत्यक्ष खर्च किती?२६ जानेवारी २0१५ पासून योजना कार्यान्वित झाली. २0१६ ते २0१९ पर्यंत योजनेवर अर्थसंकल्पानुसार सुमारे ७ हजार कोटी रूपये खर्च झाले. प्रत्यक्ष किती निधी खर्च झाला, हे शासनाने अधिकृतपणे जाहीर केले नाही.या शिवाय सीएसआर निधी, लोकवर्गणी, विविध संस्था, व्यक्तींच्या देणग्या याचा हिशोब शासनाच्या नोंदींमध्ये नाही. योजनेचा वस्तूनिष्ठपणे आढावा घेण्याचा एकदाही प्रयत्न झाला नाही.कंत्राटदारांच्या वेतनाविषयी गोपनीयता ठेवण्यात आली. गावांची सदोष पद्धतीने निवड झाल्याचेही या अभ्यासात आढळले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार