शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 4:43 AM

देशात चंद्रपूर सर्वाधिक तापलेलेच; मान्सून अजून अंदमानच्या समुद्रातच

पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे़ सलग दुसऱ्या दिवशी चंद्रपूर येथे नोंदविलेले गेलेले ४५़८ अंश सेल्सिअस हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे़ राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५़६ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे २१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़

मान्सून आगमन दक्षिण अंदमानच्या समुद्र, निकोबार बेट येथे झाल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले होते़ रविवारी मान्सून अंदमानच्या समुद्रातच असून अंदमान बेट, दक्षिण बंगालचा उपसागर परिसरात २ ते ३ दिवसांत दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे़पुढील दोन तीन दिवस अंदमान बेट व परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे़ मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या किंचित वाढ झाली आहे़ मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे़ मराठवाड्यातील कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे़

२१ ते २३ मे दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ २० मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़ २१ ते २३ मे दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ४०, लोहगाव ४१, जळगाव ४२़६, कोल्हापूर ४१़२, महाबळेश्वर ३५़५, मालेगाव ४१़४, नाशिक ३९़२, सांगली ४२, सातारा ४०़४, सोलापूर ४३़८, मुंबई ३४़२, सांताक्रुझ ३६, अलिबाग ३३़८, रत्नागिरी ३५़४, पणजी ३३़८, डहाणू ३४़४, औरंगाबाद ४०़८, परभणी ४४, नांदेड ४२़५, बीड ४२़७, अकोला ४३़८, अमरावती ४३़६, बुलढाणा ४०़७, ब्रम्हपुरी ४५़५, चंद्रपूर ४५़६, गोंदिया ४३, नागपूर ४४़१, वाशिम ४२़८, वर्धा ४४़५, यवतमाळ ४२़५़