आज दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक भीषण अपघात झाला. एक कंटेनर ब्रेक फेल होऊन सुमारे १५ ते २० वाहनांना धडकल्याने झालेल्या या अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, या अपघातात काही जण जखमीही झाले आहेत. दरम्यान, या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातातबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवीन बोगदा ते फूडमॉल हॉटेलदरम्यान हा अपघात झाला. मुंबई-पुणे महामार्गावर मुंबई लेनवर असलेल्या एका कंटेनरचे ब्रेक फेल होऊन चालकाचा त्यावरील ताबा सुटला आणि हा कंटेनर अनेक वाहनांवर धडकला. यात काही कार आणि मालवाहू वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
या अपघातामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंटेनरने वाहनांना धडक दिल्याने त्यात काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.