शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय शुल्क समितीचे संपर्क क्रमांकसुद्धा ‘नॉटरिचेबल; आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:00 IST

राज्य सरकारची बंदी असतानासुध्दा अनेक शाळांकडून सक्तीची फी वसुली केली जात आहे. या विरोधात तक्रार करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद येथील विभागीय शुल्क समितीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तेथील संपर्क क्रमांक बंद असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.

मुंबई- राज्यातील शिक्षण विभागाच्या कारभारा प्रमाणेच विभागीय शुल्क समितीचे संपर्क क्रमांकसुध्दा ‘नॉटरीचेबल‘ किंवा अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे. शिक्षण सम्राट मंत्र्यांच्या दबावापोटी फीमध्ये सवलतीचा अध्यादेश न काढता केवळ शासन निर्णय काढून पालकांच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने बंद असलेले संपर्क क्रमांक देऊन न्यायालयाचीसुध्दा फसवणूक केली आहे, असा आरोप भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. (The contact number of the Divisional Fees Committee is also ‘Notreachable; Allegation of MLA Atul Bhatkhalkar)

आमदार अतुल भातखळकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर राज्य सरकारने खाजगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार करण्यासाठी असलेल्या विभागीय शुल्क समित्या गठीत करून त्याला प्रसिध्दी देण्याचे आदेश जारी केले होते. परंतू राज्यातील शिक्षण विभागाच्या कारभारा प्रमाणेच विभागीय शुल्क समितीचे संपर्क क्रमांकसुध्दा ‘नॉटरीचेबल‘ किंवा अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे, असा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.    राज्यातील अनेक शाळांनी कोरोनाच्या काळातही भरमसाठ फी वाढ केली आहे, राज्य सरकारची बंदी असतानासुध्दा अनेक शाळांकडून सक्तीची फी वसुली केली जात आहे. या विरोधात तक्रार करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद येथील विभागीय शुल्क समितीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तेथील संपर्क क्रमांक बंद असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. महाविकास आघाडी सरकारने विभागीय शुल्क समितीच्या कारभाराबद्दल सर्व उपलब्ध माध्यमांमधून व शाळांच्या सूचना फलकांवरून प्रसिद्धी देऊ, अशी उच्च न्यायालयात शपथपत्रद्वारे हमी दिली होती, परंतु त्यातील बहुतांश संपर्क क्रमांक बंद आहेत. हा न्यायालयाचा अवमान असून, या विरोधात पुन्हा एकदा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारासुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला. 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाSchoolशाळाState Governmentराज्य सरकार