नाशिकमध्ये सात गावांमध्ये संचारबंदी वाढवली
By Admin | Updated: October 14, 2016 19:22 IST2016-10-14T19:22:22+5:302016-10-14T19:22:22+5:30
तळेगाव येथील बालिका बलात्कार प्रकरणानंतर नाशिकमध्ये सुरु असलेला हिंसाचार अजूनही पूर्णपणे शांत झालेला नाही.

नाशिकमध्ये सात गावांमध्ये संचारबंदी वाढवली
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १४ - तळेगाव येथील बालिका बलात्कार प्रकरणानंतर नाशिकमध्ये सुरु असलेला हिंसाचार अजूनही पूर्णपणे शांत झालेला नाही. त्यामुळे सात गावांमध्ये संचारबंदी २४ तास वाढविण्यात आली आहे.
पोलिसांनी इगतपुरी तालुक्यातील विल्होळी, वाडीवऱ्हे शेवगेडांग गोंदे तसेच त्र्यंम्बक तालुक्यातील तळेगाव, तळवाडे आणि अंजिनेरीं या गांमध्ये २४ तासांसाठी संचारबंदी वाढविण्यात आली आहे.
याशिवाय जिल्ह्यात दंगलीचे ४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे अथवा भावना भडकाविणाऱ्या पोस्ट प्रकरणी ७ ग्रुप ऍडमिनला पोलिसांनी अटक केल्याची माहिती नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे आणि नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली.