शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वीज ग्राहकांना मिळू शकते लवकरच खुशखबर! वाढीव बिलातील १००युनिट माफीचा सुरू आहे विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 13:38 IST

कोरोना टाळेबंदीनंतर एकदम दुपटीच्या दराने आलेल्या वीजबिलांमुळे वीज ग्राहक संतप्त

ठळक मुद्देमहावितरणला प्रस्ताव तयार करण्याची सूचना : खर्च कमी करण्याचे आदेशवीजगळती कमी करून तसेच अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन तूट भरून काढण्याचाही आदेश

राजू इनामदार 

पुणे : वाढीव वीजबिलांमळे त्रस्त झालेल्या राज्यातील वीजग्राहकांच्या किमान १०० युनिटची जबाबदारी महावितरणवर टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महावितरणला केली आहे. वीजगळती कमी करून तसेच अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन तूट भरून काढण्याचाही आदेश त्यांनी दिला आहे. कोरोना टाळेबंदीनंतर एकदम दुपटीच्या दराने आलेल्या वीजबिलांमुळे वीज ग्राहक संतप्त आहेत. लॉकडाऊनच्या मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांचे मीटर रीडिंग झाले नाही. त्यामुळे डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या तीन महिन्यांची सरासरी काढून त्याआधारे जून महिन्यात बिले पाठवली. २०२० मध्ये बिले पाठवली. जुलैत आलेली वीजबिलेही जादा दराची असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. तक्रारदार ग्राहकांची संख्या रोज वाढत आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधी पक्षांनीही वाढीव वीजबिलांवरून सरकारला धारेवर धरले. त्यामुळे डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मुंंबईत बैठक झाली. महावितरण, महापारेषण, महाजनको या तिनही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. या वेळी डॉ. राऊत यांनी वाढीव वीजबिलातील किमान १०० युनिट माफ करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. युनिट माफीचा प्रस्ताव तयार झाला तरीही तो वीज नियामक आयोगाच्या परवानगीशिवाय अंमलात आणणे शक्य नाही. आयोगासमोर या प्रस्तावाची सुनावणी होईल. कायद्यानुसार संमतीशिवाय वीज दरात वाढ वा घट करण्याचा अधिकार महावितरणला नाही.  ....................

अतिरिक्त खर्चाला कात्री लावून तोटा भरणार वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १०० युनिट माफ करणे, त्यापुढे ३०० युनिटपर्यंत ५० टक्के माफ करणे, ५०० युनिटपर्यंत २५ टक्के माफ करणे अशा सूचनाही मंत्र्यांनी केल्या आहेत. वीजगळती, वीजचोरीचे प्रमाण कमी करून तसेच अतिरिक्त खर्चाला कात्री लावून या माफीमुळे होणारा तोटा भरून काढणे शक्य असल्याची चर्चा बैठकीत झाली. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNitin Rautनितीन राऊतState Governmentराज्य सरकार