शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांशी कनेक्शन प्रकरण : 'एनआयए'ने सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 22:05 IST

एनआयएकडे एल्गार परिषदेचा तपास सोपविण्यात आल्यानंतरही या प्रकरणातील ही पहिलीच कारवाई आहे. 

ठळक मुद्देएल्गार परिषद आयोजनात सहभाग

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी असलेल्या व जमावाला भडकाविल्याच्या आरोपाखाली कबीर कला मंचचे सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना सोमवारी ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास जानेवारीमध्ये एनआयएकडे सोपविण्यात आला होता. एनआयएकडे एल्गार परिषदेचा तपास सोपविण्यात आल्यानंतरही या प्रकरणातील ही पहिलीच कारवाई आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या परिषदेच्या माध्यमातून जमावाला भडकाविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे़ पुणे पोलिसांकडे तपास असताना १७ एप्रिल २०१८ रोजी पुणे पोलिसांनी पुणे, मुंबई आणि नागपूर येथे एकाचवेळी कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे घातले होते. त्यात वाकड येथील सागर गोरखे याच्या घरातून पोलिसांनी सीडी, पुस्तके, पेन ड्राईव्ह अशा वस्तू जप्त केल्या होत्या.तसेच पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

दरम्यान, सागर गोरखे याला दर रविवारी वाकड पोलीस ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, काल रविवारी तो आला नसल्याची समजते.तसेच या दोघांचे मुंबईतील वकिलांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे. मात्र, एनआयएकडून अद्याप त्यांच्याविषयीही काहीही माहिती दिलेली नाही.

टॅग्स :PuneपुणेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाElgar morchaएल्गार मोर्चाArrestअटक