बलात्काराच्या गुन्ह्यात कॉंग्रेस कार्यकर्ता जेरबंद

By Admin | Updated: June 25, 2016 13:51 IST2016-06-25T13:51:49+5:302016-06-25T13:51:50+5:30

बलात्काराच्या आरोपाखाली एका बड्या काँग्रेस कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

Congress worker Jarband in rape of rape | बलात्काराच्या गुन्ह्यात कॉंग्रेस कार्यकर्ता जेरबंद

बलात्काराच्या गुन्ह्यात कॉंग्रेस कार्यकर्ता जेरबंद

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - बलात्काराच्या आरोपात एका बड्या काँग्रेस कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. शिवानंद हुल्याळकर असे अटकेत घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवानंद हुल्याळकर यांनी आपल्या कार्यालयातल्या एका मुलीला कामाच्या निमित्ताने मॉरिशसला नेले होते.  मात्र,  त्याठिकाणी हुल्याळकरकडून लैंगिक शोषण केले गेले. असा आरोप तक्रारदार मुलीने  केला आहे.
 
 तक्रारदार मुलगी याआधी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कामाला होती. त्यानंतर शिवानंद हुल्याळकरशी तिचा परिचय झाला आणि ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमातही झाले. तेव्हापासून तक्रारदार मुलगी शिवानंद हुल्याळकर यांच्या कार्यालयात कामाला होती. दरम्यान, याप्रकरणी शिवानंद हुल्याळकर यांची बाजू स्पष्टपणे पुढे आलेली नाही.
 
शिवानंद यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारदार मुलीनं केला आहे. दरम्यान, शिवानंद यांच्या ड्रायव्हरनं मात्र याबाबत वेगळीच माहिती दिली आहे. ‘आमचे मालक त्या मुलीवर जीवापाड प्रेम करायचे. तिला फ्लॅटही घेऊन दिला होता. तसेच सोनं आणि 10 लाख रुपयेही दिले होते. त्यांना तिच्याशी लग्नही करायचं होतं. ते तिला मॉरिशिअसला फिरायला देखील घेऊन गेले होते. पण तिला आणखी पैसे हवे होते. लग्नानंतर सारं काही तुझंच आहे असंही त्यांनी तिला सांगितलं होतं. पण मॉरिशिअसहून आल्यावर तिनं मालकांविरोधात तक्रार केली. 
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्याविरोधात तक्रार नोंदवून घेतली असून या प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे

Web Title: Congress worker Jarband in rape of rape