शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 15:37 IST

आळंद दि १४ : कर्नाटकातील जनता अन्न पाणी विद्या व शेतकºयांंची सहकार खात्याची कर्जमाफी तसेच अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्यामुळे व सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात असल्यामुळे हात देणार नाही़

ठळक मुद्देकर्नाटक भूकमुक्त राज्य बनले भाजप समाज फोडण्याचे व परस्पर जातीत विद्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे़अमित शहा यांच्या प्रस्तावित स्टॅट्रीजीचा फज्जा उडेल

आॅनलाइन लोकमत सोलापूरआळंद दि १४ : कर्नाटकातील जनता अन्न पाणी विद्या व शेतकºयांंची सहकार खात्याची कर्जमाफी तसेच अल्पसंख्याक व अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्यामुळे व सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात असल्यामुळे हात देणार नाही़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात पुन्हा एकदा कॉंग्रेसचेच सरकार येणार आहे असा आत्मविश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी  आळंद येथे बोलताना व्यक्त केला. कलबुरगी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या मिनी विधानसौध बांधकामाचे भूमिपूजन व विविध विकास कामांचे कोनशिला अनावरण समारंभात ते बोलत होते़  पालकमंत्री डॉ.शरणप्रकाश पाटील यांनी हैदराबाद कर्नाटक विकास महामंडळाच्या कामाचा संक्षिप्त आढावा घेतला. स्वागत व प्रास्ताविकात आमदार बी.आर.पाटील यांनी केले़  शेतकºयांच्या कर्जमाफीबध्दल मुख्यमंत्र्यांचा हिरवी शाल व नांगर देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास औशाचे आ़ बसवराज पाटील, आ़  सिध्दाराम म्हेत्रे, माजी मंत्री बाबुराव चिंचनसूर, ईशान्य कर्नाटक परीवहन मंडळाचे अध्यक्ष इलियास बागवान, आमदार जी.रामकृष्ण, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष भागनगौड संकनूर, ----------------भुकमुक्त कर्नाटक म्हणून कर्नाटकची ओळख़़.....राज्यातील १.८ लाख कुटुंबातील ४ लाख जनतेला मोफत तांदूळ देत असल्यामुळे कर्नाटक भूकमुक्त राज्य बनले आहे तसेच दुधउत्पादकांना लिटरला प्रतिलिटर ५ रु.अनुदान, अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी २७ हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद व पाटबंधारे विभागावर ६० हजार कोटी रुपये खर्च केले जे मागच्या भाजप सरकारने १८ हजार कोटी खर्च केले होते असा विकासाचा चढता आलेख पहाता जनता आम्हाला कशी दूर करेल. आम्ही सर्व जाती धर्माच्या जनतेला एकत्रित घेऊन जात आहोत पण भाजप समाज फोडण्याचे व परस्पर जातीत विद्वेष निर्माण करण्याचे काम करत असल्यामुळे येडीयूरप्पांच्या मिशन १५० व अमित शहा यांच्या प्रस्तावित स्टॅट्रीजीचा फज्जा उडेल असे सिध्दरामय्यांनी स्पष्ट केले़