शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 07:04 IST

गेल्या सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होते. विजय वडेट्टीवार यांच्यावर ती जबाबदारी  होती.

-कमलेश वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेने दावा केला तर काँग्रेसतर्फे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाणार आहे. तशा हालचाली काँग्रेस नेत्यांनी सुरू केल्या असून या संबंधीचा तोंडी प्रस्तावही उद्धवसेनेकडे देण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

 गेल्या सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होते. विजय वडेट्टीवार यांच्यावर ती जबाबदारी  होती. तर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची धुरा उद्धवसेनेच्या अंबादास दानवे यांच्याकडे होती. आता  मविआतील  कोणत्याही एका पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नाही.  

विधानपरिषदेत कुणाचे किती संख्याबळ?  विधानपरिषदेत उद्धवसेनेचे सात व काँग्रेसचे सात सदस्य आहेत. शरद पवार गटाचे पाच सदस्य आहेत.काँग्रेस व उद्धवसेनेचे संख्याबळ समान असल्यामुळे काँग्रेसने परिषदेवर आपला दावा सादर केला आहे. 

अधिवेशनात निर्णय? विरोधी पक्षनेतेपद हे संविधानिक अधिकार मिळवून देणारे पद आहे. हे पद ज्या पक्षाला मिळते अप्रत्यक्षपणे त्या पक्षालाही बळ मिळते.त्यामुळेच काँग्रेस विधानसभा व विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात एकट्या उद्धवसेनेला विरोधी पक्षनेतेपद सोपविण्यास तयार नाही. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनात यावर योग्य निर्णय होईल.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidhan Parishadविधान परिषदcongressकाँग्रेस