शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विशाल पाटील कोणत्या पक्षातून लढणार? विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये; राऊतांनी सांगलीतच छेडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 12:46 IST

Sanjay Raut on Vishal Patil, Devendra Fadanvis: सांगलीतील उमेदवारीवरून राऊतांनी काँग्रेसला निशाण्यावर घेतले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. जर त्यांचे उपचार नागपूर मध्ये होत नसतील तर उपचार ठाण्यात करू, किंवा मुंबईत करू, असा चिमटाही राऊत यांनी काढला. 

सांगलीतील लोकांना बदल हवा आहे. सांगलीत विद्यमान खासदारांविरोधात लोकांमध्ये खदखद आहे. काल दिल्लीत वरिष्ठांची चर्चा झाली. ती काय झाली हे मला माहिती आहे. विशाल पाटील कोणत्या पक्षातून लढणार आहेत असा सवाल करत राऊतांनी त्यांचे विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये, असे म्हणत विमाने भरकटतात, असा टोला लगावला आहे. 

सांगलीतील उमेदवारीवरून राऊतांनी काँग्रेसला निशाण्यावर घेतले आहे. भाजपाने लोकांच्या मनातील धनुष्य बाण चिन्ह नष्ट करण्याचे ठरविले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा उमेदवार ठाणे कल्याण आणि डोंबिवली मतदार संघात जिंकतोय. तिथे भाजप शिंदे गटाची बी टीम आहे, त्यांना काही अस्तित्व नाही. भाजप शिंदे गटाला काही मतदारसंघात धनुष्यबाण वापरायला देत नाहीय. कोकणासह अनेक मतदार संघात आम्ही चाळीस चाळीस पन्नास वर्ष  धनुष्य बाणावर लढलो होतो असा आरोप राऊत यांनी केला आहे. 

तसेच आमच्यातील सगळे वसुलीवाले लोक भाजप मध्ये गेले आहेत. भाजपचे वसुली रॅकेट सुरु आहे. राष्ट्रवादीत रॅकेट चालवणारे सगळे भाजपमध्ये गेले. यासाठी आम्ही भाजपाचे आभार मानतो. त्यात ईडी आणि सीबीआय सगळे भाजपचे लोकं आहेत. आठ हजार कोटी रुपये जे भाजपच्या निधीमध्ये गेले ते या वसूली रॅकेट मधून आले होते, असा आरोपही राऊत यांनी केला आहे. 

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. जर त्यांचे उपचार नागपूर मध्ये होत नसतील तर उपचार ठाण्यात करू, किंवा मुंबईत करू, असा चिमटाही राऊत यांनी काढला. 

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSangliसांगलीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४