शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “...म्हणून महाविकास आघाडीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले”; काँग्रेस नेत्याचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:04 IST

Maharashtra News: ...तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले असते, असा विश्वास काँग्रेस नेत्याने व्यक्त केला आहे.

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून  अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आणि महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याबाबत काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिली. 

नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. नाना पटोलेंसारखा सक्षम नेता विधानसभेच्या अध्यक्षपदावर विराजमान होता. त्यांनी सभागृह उत्तमपणे चालवले. सभागृहाचे नियंत्रण त्यांच्या हातात होते. परंतु त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. तसेच नवीन अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यावेळी अनेकांच्या भावना होत्या की, नानाभाऊंनी राजीनामा द्यायला नको हाता. नानाभाऊंनी राजीनामा दिला नसता तर हे सरकार टिकले असते, अशा सर्वांच्या भावना होत्या, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा मंजूर झाला का?

विजय वडेट्टीवार यांनी दिल्ली येथे जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. बाळासाहेब थोरात यांनी दिलेला विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा मंजूर झाला आहे का? यावर, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही ही गोष्ट काँग्रेस हायकमांड ठरवेल, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय देखील काँग्रेस हायकमांड घेईल. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची दिल्लीत भेट घेतली आहे. यावेळी राज्यातली परिस्थिती त्यांच्या कानावर घातली, अशी माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले