शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसची पाठ सरळ व्हायला तयार नाही", महाराष्ट्रातही 'मविआ'त ठिणगी! राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:30 IST

जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत झाल्याचे म्हणत विजय वडेट्टीवारांनी मविआ नेत्यांना धारेवर धरलं आहे.

Mahavikas Aghadi: दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीमध्ये फूट पडल्यानंतर आता महाराष्ट्रातही महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवारुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये घमासान सुरु झालंय. विधानसभेसाठी जागावाटपात वेळ घालवल्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी केला आहे. यावरुन आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मरगळ झटका आणि कामाला लागा असा सल्ला दिला. त्यावर प्रत्युत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभवाचा जोरदार झटका बसल्यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस आता बाहेर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं मात्र विधानसभेला त्यांनी सपाटून मार खाल्ला. तिन्ही पक्षांना मिळून ५० जागांचा आकडाही गाठता आला नाही. त्यावरुन तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद झाल्याचे पाहायला मिळालं. अशातच मविआच्या नेत्यांनी जागावाटपात वेळ वाया घालवला असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केली.

ठाकरे गट अजूनही झोपेत - अमोल कोल्हे

दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाच्या बैठकीत काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य केल्याचे म्हटलं जात आहे. यावरुनच विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जर थोडा कमी द्यावा, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा जर दोन दिवसात सुटला असता तर आम्हाला १८ दिवस प्रचारासाठी आणि प्लॅनिंग साठी उपयोगी पडले असते. त्यामुळे आम्हाला कोणतेही प्लॅनिंग करता आले नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आम्हाला तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही, अशी अनेक कारणे पराभवासाठी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ, याचाही फटका आम्हाला विधानसभा निवडणुकीत नक्की बसला. जागा वाटपाच्या चर्चेत संजय राऊत आणि नाना पटोले हे प्रमुख होते. बैठकीची वेळ अकरा वाजेची असताना काही नेते बैठकीला दोन वाजता येत होते. मी कोणाचेही नाव घेणार नाही मात्र, या सर्व कारणांमुळे बैठकीचा वेळ लांबत होता. एकाच जागेवर वारंवार चर्चा केली गेली. त्यामुळे ही कोणाची प्लॅनिंग होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीच्या जागेची चर्चा दोन दिवसात सांगली असती तर आम्हाला अधिकचा वेळ मिळाला असता. वीस दिवस जागा वाटपात गेले," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

बैठकीला उशीर का झाला हे वडेट्टीवारांना माहिती - संजय राऊत

"जागा वाटपाच्या चर्चेमध्ये विजय वडेट्टिवार देखील होते. त्यामुळे उशीर होण्याचे कारण त्यांना देखील माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा लांबवण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, वडेट्टीवांरांनी विदर्भातील जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असत्या, तर जागा वाटपाची चर्चा लवकर संपली असती. लोकसभा निवडणुकीतील वियजामुळे आता आम्हीच जिंकू असे कॉंग्रेसला वाटत होते. त्यामुळे जास्तीत जास्त जागा जिंकून कोणालातरी मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, आपण एकत्र लढलो पाहिजे असे आमचे मत होते. त्यामुळे जागा वाटपाला उशीर झाला याला सर्वच जबाबदार आहेत," असं संजय राऊतांनी म्हटलं.

आघाडी तुटली तर त्याची किंमत सर्वांना भोगावी लागेल

"विधानसभा निवडणूक नंतर देखील महाविकास आघाडीची अद्याप एकही बैठक झाली नाही. हे सत्य आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही, ती व्हायला हवी होती. तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय राहिला नाही. मात्र, आघाडी तुटली तर त्याची किंमत सर्वांना भोगावी लागेल. काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे शंभर पेक्षा जास्त खासदार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे," असंही संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोले