शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 05:29 IST

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आर्वी : काँग्रेसद्वारे शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासन देण्यात येत आहेत. सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ, असे सांगितले जात आहे. सोयाबीनला काँग्रेसशासित राज्यांमध्ये केवळ ३,८०० रुपये भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. काँग्रेस ७ हजाराचा भाव आपल्याच राज्यांत देऊ शकत नसेल, तर महाराष्ट्रात कसा देणार, असा रोखठोक सवाल करतानाच काँग्रेसची आश्वासनेही फक्त निवडणुकीपुरती येतात, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला.

शेतकरी, युवक, महिला व सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सरकारद्वारे प्रयत्न केले जात आहे. मोफत वीज, नमो सन्मान योजना, वीज बिल माफी, महिलांकरिता लाडकी बहीण योजना, वर्षभर शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्याकरिता सौरकृषी पंप योजना, कापूस व सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी झाल्यास भावांतर योजनेंतर्गत मदत, अशा अनेक योजना राबविल्या जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

आर्वी येथील गांधी चौकात महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचन सोयी उपलब्ध व्हाव्या, याकरिता नदीजोड प्रकल्प सुरू करून ओलिताची सोय करून देण्यात येणार आहे. महिलांकरिता लखपती दीदी, लाडली बहीण, एसटीमध्ये अर्धे तिकीट, शिक्षणाची सुविधा, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांचा विकास साधला आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

कमी बोलणे व जास्त काम करणारे नेतृत्व

सुमित वानखेडे हे कमी बोलणे व जास्त काम करणे या स्वभावाचे असून, कोणतेही काम हाती घेतल्यानंतर जोपर्यंत काम होत नाही, तोपर्यंत ते स्वस्थ बसत नसल्यामुळे असा जनसामान्याचा नेता असल्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अफवांना बळी न पडता मतदान करा

फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असताना मोठा निधी आर्वी मतदारसंघाच्या विकासासाठी दिला. आर्वी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकास व प्रकल्प गतिमान करण्याकरता कोणत्याही अफवेला बळी न पडला सुमित वानखेडे यांना सहकार्य करा, असे आमदार दादाराव केचे म्हणाले. 

घराणेशाही रोखा : सुमित वानखेडे

खासदार अमर काळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुमित वानखेडे म्हणाले की, आतापर्यंत आपल्याला निष्क्रिय खासदार समजत होतो. पण, आपण ड्रामेबाजही आहे, हे कालच्या सभेतून कळले. लोकशाही वाचविण्याकरिता घराणेशाहीला रोखा, असे आवाहन वानखेडे यांनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४arvi-acआर्वीMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस