शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही”; राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:39 IST

Maharashtra Political Crisis: हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न असून, फेसबुक लाइव्ह आणि विधिमंडळात बोलणे यात फरक आहे, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही यावर भाष्य केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी रोखठोक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही, असे दिलेल्या राजीनाम्यावरून दिसल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला दिले होते. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीच्या बाजूने निकाल दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यावर बोलताना, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभ्रमात टाकणारा होता. या निकालातून काही स्पष्टता आलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. बरीच अनिश्चितता आहे. ११ जुलैला याचिकांवर सुनावणी करु सांगू आणि आता आपलाच निर्णय बदलला. त्यांनी विचित्र निर्णय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ही अपेक्षा नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती

उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता. राज्यातील जनतेला त्यांची बाजू कळाली असती. विरोधी पक्षनेते तसेच आणखी काही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केले हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आले असते. एक-दोन तास सभागृह चालले असते आणि नंतर निर्णय घेतला असता तर चालले असते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही

आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही. रक्तपात होईल वैगेरे असे जे काही ते म्हणाले ते खोटे होते. त्यांनी लढायला हवे होते. ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अडीच वर्ष पाठिंबा दिला त्यांना सांगायला हवे होते. फेसबुक लाइव्ह आणि विधिमंडळात बोलणे यात फरक आहे. विधीमंडळात जे बोलतो ते रेकॉर्डवर राहते, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न आहे

इतक्या मोठ्या प्रमाणात माणसे नाराज आहेत. याचा त्यांना अंदाजच आला नाही. त्या धक्क्यातून ते बाहेरच आले नाहीत. माझ्या इतक्या माणसांनी दगा दिला असे ते सारखे म्हणत राहिले. खाली काय सुरु होते याचा त्यांना अंदाज आला नाही. हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न आहे. भाजपाला थांबवण्यासाठी त्यांनी दुसरा पर्याय दिला असता तर आम्ही मान्य केला असता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर राग काढला तोही काही खरा नव्हता. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले तसेच यावेळी घडेल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. शरद पवारांनी दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते असल्याने कनिष्ठ व्यक्तीच्या हाताखाली काम करणे अवघड जाईल अशी भूमिका घेतली होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरे