शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापुर्वी कार्यकर्त्यांची धरपकड : आंदोलनाचे गालबोट  न लागण्याची खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 19:17 IST

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला आंदोलनाचे गालबोट लागू नये, याची विशेष खबरदारी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतली असल्याने शनिवारी सकाळपासूनच आंदोलक कार्यक्रर्त्यांच्या घरी पोलीस दाखल झाले.

पिंपरी : नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील विविध संघटनांनी शनिवारी आंदोलनाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला आंदोलनाचे गालबोट लागू नये, याची विशेष खबरदारी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतली असल्याने शनिवारी सकाळपासूनच आंदोलक कार्यक्रर्त्यांच्या घरी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याने कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यकत केल्या.                       भारतीय जनता पक्षाच्यावतीने पिंपरी चिंचवडमध्ये प्राधिकरणात शनिवारी अटल संकल्प महासंमेलन आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उपस्थिती असल्याने कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे  लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तयारी केली होती. आक्रमक पवित्रा न घेता, सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले असतानाही शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांच्या मोहनननगर येथील घरी पोलीस पोहोचले. ओदांलन करायचे नाही,आपण आपल्या कार्यकर्त्यांनाही निरोप द्या, आमच्याबरोबर पोलीस ठाण्यात चला. असे म्हणत पोलिसांनी भापकर यांना  पोलीस ठाण्यात नेले. कार्यकर्त्यांची अशीच धरपकड थेरगाव, चिंचवड, निगडी येथे केली.                  सत्ताधारी पक्षाची एक प्रकारची आणीबाणी आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. गत निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली होती, त्या आश्वासनासंबंधीत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन जाहीर केले होते. या आंदोलनात नागरी हक्क सुरक्षा समिती, स्वराज्य, मनसे, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, समाजवादी पक्ष, भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते सहभागीग होणार होते. पोलिसांनी २५ हून अधिक कार्यकर्त्यांना आंदोलन न करण्याच्या सूचना दिल्या. 

मूलभूत अधिकारांवर गदा सामाजिक कार्यकेर्त मारूती भापकर म्हणाले, ही एक प्रकारची अघोषित आणीबाणी आहे. नागरिकांच्या मुलभूत अधिकारावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. शहरातील नागरिकांचा शास्ती कर माफीचा मुद्दा, रिंग रोड प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन, रेड झोन हद्द कमी करणे, एसआरए अंतर्गत ५०० चौरसफुटांची घरे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव या मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन जाहीर केले होते.  त्याचबरोबर महापालिकेतील गैरव्यवहारास आळा घालण्याची मागणी या उद्देशाने केले जाणारे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला. असेच पुढे होत राहिले तर न्यायालयीन लढा लढण्याची तयारी आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसArrestअटक