शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधाचा सूर सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 05:12 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला चार वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकार विरोधी सूर सापडला आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला चार वर्ष पूर्ण होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीला सरकार विरोधी सूर सापडला आहे. काँग्रेसने संघर्ष यात्रा काढून राज्यभर विरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली तर राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रा काढून सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला आहे.विरोधी पक्ष आहे कुठे आहे, असा प्रश्न गेली चार वर्ष विचारला जात होता. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असून देखील शिवसेना नेते विरोधकांची भूमिका बजावत होते. मात्र जशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे दोन्ही काँग्रेसने आपापसातील मतभेद विसरुन एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर आमचे लोकसभेच्या ४२ जागांवर एकमत झाले आहे, असेही जाहीर करुन टाकले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सतत पाण्यात पाहणारे राष्टÑवादीचे नेते आता त्यांच्या शेजारी बसून राज्यातील विरोधी पक्षाची रणनिती ठरवू लागले आहेत. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे सांगून अजित पवार यांनी त्या वादावर पडदा टाकला.राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेल्या ५६ प्रश्नांचे किंवा काँग्रेसने तूरदाळीवरुन उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर भाजपाने दिले नाही. विरोधकांच्या एकीमुळे शिवसेनेला जवळ करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज सरकारवर टिकेची झोड उठवत असताना भाजपामधील एकही नेता शिवसेनेविरुद्ध ब्र काढायला तयार नाही. यातूनच भाजपाची अगतिकता दिसून येते.चव्हाणांचा पुढाकारविधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सरकारबाबत नरमाईची भूमिका घेतल्याची टीका झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून खा. अशोक चव्हाण यांनी राज्यात सरकार विरोधी वातावरण तयार करण्यात आघाडी घेतली. सरकारविरोधी वातावरण होऊ शकते असे दिसू लागताच विरोधक आक्रमक झाल्याचे दिसते.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा