शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना 'या' गोष्टीसाठी सुबुद्धी द्यावी; काँग्रेसच्या नाना पटोलेंचे विठ्ठलाकडे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 19:40 IST

Nana Patole at Pandharpur, Aashadhi Wari: संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली व गजानन महाराजांच्या पालखीचे नाना पटोले यांनी घेतले दर्शन

Nana Patole at Pandharpur, Aashadhi Wari: आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. "राज्यात सुख समृद्धी नांदू दे. महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त होऊ दे. राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधा-यांना दे," असे साकडे पटोले यांनी विठ्ठलाला घातले. विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडीत पायी चालताना पटोलेंनी वारक-यांसह पाऊल खेळण्याचा आनंद घेतला.

नाना पटोले यांनी मंगळवेढा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा माउली तुकाराम आणि 'गण गण गणात बोते' च्या गजरात सभोवतालचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. परंपरेनुसार नाना पटोले दरवर्षी पालखींचे आगमन झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात जाऊन दर्शन घेतात व वारकऱ्यांबरोबर विठुमाऊलीच्या भक्तीत रमतात. तोच दिनक्रम यावेळीही त्यांनी काटेकोरपणे पाळला.

सोलापूरवरून पंढरपूरकडे जात असताना पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे ग्रामस्थांकडून नाना पटोले यांचे स्वागत करण्यात आले आणि सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेचे अध्यक्ष चेतन नरुटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, विजय हत्तुरे,  सुरेश हसापुरे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :PandharpurपंढरपूरNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahayutiमहायुती