शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:01 IST

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विश्वास

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास काँग्रेस नेत्या आणि महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. भाजपामध्ये गेलेले अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतू शकतात, असा दावादेखील त्यांनी केला. महाराष्ट्रानं देशाला नवा फॉर्म्युला दिला असून आमचं सरकार यशस्वीपणे कार्यकाळ पूर्ण करेल, असंदेखील त्या म्हणाल्या.ऑक्टोबरपर्यंत ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल, असं म्हटलं. त्यावर बोलतान भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर नीट लक्ष ठेवावं, असं सूचक विधान ठाकूर यांनी केलं. त्या न्यूज१८शी बोलत होत्या.त्याआधी पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी भाजपाला लक्ष्य केलं. 'कोरोना संकट काळात महाविकास आघाडी सरकारबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची आवश्यकता आहे. सत्तेत नसल्यानं काहींना असुरक्षित आणि अस्वस्थ वाटत आहे,' अशा शब्दांत आदित्य ठाकरे विरोधकांवर बरसले.त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. सामनाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी आपण सरकारचे रिमोट कंट्रोल नसल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री सरकार चालवतात, असं पवार म्हणाले. पक्ष तीन असले, तरीही त्यांचा उद्देश एकच असल्याचं पवार यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरSharad Pawarशरद पवारAditya Thackreyआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊत