शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 14:17 IST

Sunil Kedar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या आमदाराला दिलेल्या इशाऱ्यानंतर सुनील केदार चांगलेच आक्रमक झालेत.

Sunil Kedar on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. अनेक ठिकाणी प्रचारादरम्यान नेते मंडळींनी पातळी सोडून एकमेकांवर टीका देखील केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या रोखठोक शैलीत उघडपणे शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना इशारा दिला होता. तू आमदार कसा होतो तेच बघतो असं म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांना आव्हान दिलं. त्यावर आता काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी अजित पवारांना चॅलेंज दिलं आहे.

सुनील केदार हे पुण्यात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी पुण्यातील क्रीडा विद्यापीठाचे कामकाज कुठे अडकलं आहे असा सवाल त्यांना केला. त्यावर बोलताना सुनील केदार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. धमकी देण्यातून लोकशाही येत नाही, असं म्हणज केदार यांनी अजित पवारांना सुनावलं. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी लोकशाही समजून घ्यायला हवी, असंही सुनील केदार म्हणाले.

"सुनील केदारचा तु्म्हाला राग असेल तर विद्यापीठाला माझं नाव देऊ नका. राज्याच्या नवी पिढीसाठी उपयोगी उपक्रम होता. मी नागपुरात न करता तो पुण्यात केला. महाराष्ट्रात काही होऊ द्यायचे नाही आणि नुसत्या गप्पा मारायच्या तुला पाहतो, तू कसा निवडून येतो असा दम द्यायचा. नागपुरात ये कसा निवडून येतो ते मी सांगतो. नागपूरला ये नाहीतर मी बारामतीमध्ये येतो. लोकशाहीमध्ये लोकांची कॉलर पकडून मत मागायचे नसते. लोकांच्या मनात जिव्हाळा आणि विश्वास निर्माण करायचा असतो. राज ठाकरेंना खूप स्वप्ने पडत असतात आणि त्यातून ते बोलत असतात," असं सुनील केदार म्हणाले.

तू आमदार कसा होतो तेच बघतो - अजित पवार शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार यांनी बोलताना हे विधान केलं होतं. "दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असं म्हणत होते आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री होणार आहे. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली. बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो," असं म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांना आव्हान दिले होते.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sunil Kedarसुनील केदारAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस