शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 11:49 IST

आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देऊन राज्यभरात दलित मतं मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई: आगामी लोकसभेसाठी एमआयएमसोबत युती केलेल्या भारिप बहुजन महासंघाच्याप्रकाश आंबेडकरांनाकाँग्रेस अकोल्यात पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देऊन राज्यभरात दलित मतं मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र अद्याप यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलेलं नाही.प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न केले. मात्र, आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमसोबत हातमिळवणी केली. यानंतरही काँग्रेसकडून आंबेडकरांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांनी एमआयएमलादेखील महाआघाडीत घेण्याची अट घातली. ही अट काँग्रेसनं अमान्य केली. भाजपाला सत्तेपासून रोखायचं असल्यास धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळावं लागेल, असं राज्यातील काँग्रेस नेत्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेसकडून आंबेडकरांना अकोला लोकसभा मतदारसंघात पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. अकोल्यात भारिप बहुजन महासंघाला पाठिंबा देऊन राज्यभरात त्यांची मतं मिळवायची, असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांचा प्रवेश व्हावा, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांबद्दल आंबेडकरांनी गेल्याच आठवड्यात शंका उपस्थित केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेला महाआघाडीचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स असल्याचं टीकास्त्र भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोडलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं लोकसभेचं जागावाटप पूर्ण झालं आहे. त्यामुळे आम्हाला आघाडीत घेण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेला प्रयत्न हा निव्वळ दिखावा असल्याचं आंबेडकर म्हणाले होते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन