शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

‘ते’ पत्र सार्वजनिक केल्याने काँग्रेसचे नेतृत्व नाराज; केदार यांच्याविरुद्ध आशिष देशमुखांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 06:28 IST

पक्षाचे सचिव प्रणव झा यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगत स्पष्ट केले आहे की, एखाद्याला आपले म्हणणे पक्षात मांडण्याचा अधिकार आहे. पण, पक्षाध्यक्षांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्याचा प्रकार नेतृत्व सहन करणार नाही. 

- शीलेश शर्मालोकमत न्यूज नेटवरनवी दिल्ली : पंजाब, छत्तीसगढ आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीसपदी दोनच दिवसांपूर्वी नियुक्ती झालेल्या आशिष रणजीत देशमुख यांनी आघाडी सरकारमधील मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात एक पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले आहे. मात्र, हे पत्र सार्वजनिक केल्यामुळे पक्ष नेतृत्व नाराज आहे. सूत्रांनी सांगितले की, पक्ष नेतृत्व याला अंतर्गत गटबाजीचा परिणाम मानते. 

पक्षाचे सचिव प्रणव झा यांनी हे प्रकरण जुने असल्याचे सांगत स्पष्ट केले आहे की, एखाद्याला आपले म्हणणे पक्षात मांडण्याचा अधिकार आहे. पण, पक्षाध्यक्षांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्याचा प्रकार नेतृत्व सहन करणार नाही. 

पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांचेही म्हणणे आहे की, अशा प्रकारे सार्वजनिक वक्तव्ये पक्ष स्वीकार करणार नाही. आशिष देशमुख यांच्या पत्रामागे काँग्रेसच्याच काही नेत्यांचा हात आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले आशिष देशमुख हे पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.

केवळ भाजप नेतृत्वाचा विश्वास जिंकण्यासाठी ते सातत्याने आघाडी सरकारविरुद्ध वक्तव्ये करीत आहेत. सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते केदार यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे लवकरच ते भाजपमध्ये जातील. दरम्यान, आशिष देशमुख यांच्या पत्रामागचा हेतू काय होता तसेच कोणाच्या इशाऱ्यावरून हे पत्र लिहिले गेले याची माहिती पक्ष नेतृत्व घेत आहे. 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारAshish Deshmukhआशीष देशमुखcongressकाँग्रेस