शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

देशावर आलेली वेळ मानवनिर्मित; नागरिकांच्या मृत्यूचा सौदा करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान : पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:13 IST

कोरोनाच्या परिस्थितीवरू काँग्रेसकडून होत आहे टीका. मोदी हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान, पटोले यांची टीका.

ठळक मुद्देकोरोनाच्या परिस्थितीवरू काँग्रेसकडून होत आहे टीका.मोदी हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान, पटोले यांची टीका.

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काँग्रेसकडून सातत्यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर सरकारवर टीका केली. "आपल्या देशावर जी वेळ आली आहे. ती मानवनिर्मित साथ आहे. पंतप्रधान हे भाजपचे आहेत, ते देशाचे नाहीत. त्यांनी देशाला कोरोनाच्या संकटात लोटले, मोदी यांनी ही परिस्थिती मुद्दाम आणली. हा प्लॅन असून, जागतिक पातळीवर हा प्लॅन झाला," असा आरोप त्यांनी यावेळी केला. जळगावमधील फैजपूर येथे बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 

"चीनचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी एकत्र आले होते आणि त्यानंतर १९ नोव्हेंबरला पहिला रुग्ण सापडला. हा जागतिक प्लॅन होता. आपल्या देशाच्या नागरिकांचा मृत्यूचा सौदा करणारे मोदी हे  जगातील एकमेव पंतप्रधान आहेत," असं म्हणत पटोले यांनी निशाणा मोदींवर निशाणा साधला. 

ताटं वाजवून कोरोना बरा झाला असता तर..."देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यात येतील असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख न देता लॉकडाऊन लावून देशवासीयांना घरात बसवले. कोरोना काळ‌ात उपाययोजना करण्यापेक्षा ताटं वाजविण्यावर मोदींनी भर दिला. ताटं वाजवून कोरोना बरा झाला असता तर रुग्णालयांची गरज भासली नसती," असाही चिमटा त्यांनी काढला. खाद्य तेल असो अथवा इंधन, यांच्या किंमती वाढवून मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटल्याचीही टीका त्यांनी केली.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी"देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कोरोना संदर्भात महत्वाचे सल्ले दिले होते. परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही याची किंमत देशाला हजारो बळी देऊन मोजावी लागली आहे. कालच राहुल गांधी  यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल इशारा देत योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे. मागील दोन लाटेत मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांमुळे निष्पाप लोकांचे बळी गेले. आतातरी सरकारने जागे व्हावे आणि वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात," असे नाना पटोले म्हणाले.

सात वर्षांत देशात अनागोंदी वाढलीमोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळात देशात अनागोंदी वाढली आहे. पीक वीमा योजनेतूनही शेतकऱ्यांना लुटले जात आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल मोठ्या प्रमाणात महाग झाले आहे, बरोजगारी वाढली आहे याविरोधात काँग्रेस लढा देत आहे. कोरोना संकटामुळे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यास बंधने आहेत मात्र काँग्रेसने कोरोनाचे नियम पाळून मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने केली आहेत आणि पुढेही करत राहू. मोदी सरकारच्या काळात फक्त त्यांच्या मूठभर उद्योगपती मित्रांनाच लाभ झाला असून सर्वसामान्य जनता बेहाल झाली आहे. २०२४ च्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं आवाहनही केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीPraniti Shindeप्रणिती शिंदे