शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:43 IST

Congress Harshwardhan Sapkal: भाजपा कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे हे सातत्याने उघड होत आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

Congress Harshwardhan Sapkal: जगाच्या पोशिंद्याला शिवीगाळ करणे हा विकृतीचा कळस आहे. भाजपाचे माजीमंत्री बबनराव लोणीकर यांची ही मुजोरी सहनशिलतेच्या पलिकडे गेली आहे. बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

पारावर बसणारे काही तरुण लिहितात की, गावातील ९-१० लोक माझ्या दावणीला बांधलेले आहेत. ते मोदी-फडणवीसांचे अंधभक्त आहेत. हे लोक विचारतात की, मोदींनी काय दिलं? फडणवीसांनी काय दिलं? आणि आमदाराने काय दिलं? गावात जे काही मिळालं ते गेल्या २५ वर्षांत मीच दिलं. ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? असे विधान बबनराव लोणीकर यांनी केले होते. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.

नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपा नेत्यांचा भ्रम

प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे हे सातत्याने उघड होत आहे. एक भाषा, एक धर्म, एक नेता हा त्यांचा हट्ट आहे आणि आम्हीच सर्वकाही आहोत हा दर्शवणारा घृणास्पद प्रकार आहे. जनतेच्या मतातून सरकार स्थापन होते व जनतेच्या पैशातूनच योजना राबिवल्या जातात. सरकार शेतकऱ्यांना काही देते म्हणजे उपकार करत नाही. नरेंद्र मोदीच सर्व देतात हा लोणीकर सारख्या लोकांचा भ्रम आहे. शेतकऱ्याचा बाप काढणे हा संतापजनक प्रकार आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांनेही आधी शेतकऱ्याला भिकारी म्हणून अपमान केला होता, अशी टीका सपकाळ यांनी केली. 

दरम्यान, राजकीय पक्षांचे गाव पातळीवरील काही कार्यकर्ते गावात आहेत. ते पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना ट्रोल करतात. मी त्यांच्याबाबतीत बोललो. आमची भाषा खेड्यातील आहे. आम्ही वडिलांना बाप आणि आईला माय म्हणतो. एखाद्या मुलाने काम केले नाही, तो नीट शिकला नाही, तर आम्ही त्याला कार्ट म्हणतो. ही आमची बोलीभाषा आहे. मी माझ्या ग्रामीण भाषेत बोललो. मी मागील ४० वर्षांत केव्हाही सर्वसाधारण माणूस किंवा शेतकऱ्यांविरोधात बोललो नाही. मी नेहमी त्यांच्याबाजूने उभा राहणारा माणूस आहे. काही राजकारणी माझ्या विधानाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता जनार्दन माझी माय-बाप आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी २५ वर्षांपासून निवडून येत आहे. त्यामुळे माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गरीब माणूस किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही. मी शेतकऱ्यांची एकदा काय हजारवेळा माफी मागेल. पण, मी त्यांच्याविषयी काहीही चुकीचे बोललो नाही. मला त्यांच्याविषयी आदर वाटतो, असे स्पष्टीकरण बबनराव लोणीकर यांनी वाद वाढल्यानंतर दिले. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळBabanrao Looneykarबबनराव लोणीकरBJPभाजपा