शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

“स्मारकाच्या घोषणा झाल्या पण अंमलबजावणी कधी करणार?”: हर्षवर्धन सपकाळ यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 19:22 IST

Congress Harshwardhan Sapkal News: लक्ष्मी ऑरगॅनिक्स या घातक प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा विरोध असून, याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Congress Harshwardhan Sapkal News: चिपळूणमधील शिबिरातून नेतृत्व विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. या शिबिराने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल. आघाडीचे राजकारण ही अपरिहार्यता आहे पण त्याचा कोकणातकाँग्रेस पक्षाला फटका बसला आहे. आगामी काळात कोकणात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याच अनुषंगाने कोकण विभागात हे तीन दिवसाचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी कार्यशाळेची सांगता झाली. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील स्मारकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. मुख्यमंत्री व मंत्र्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे स्मारक करण्याच्या घोषणा अनेकवेळा केल्या पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, हे भाजपा महायुती सरकारच्या करंटेपणाचे लक्षण आहे. संभाजी महाराज यांचे स्मारक न करण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशाची भिती वाटत आहे, संभाजी महाराजांच्या स्मारकामुळे मुख्यमंत्र्यांच्या ‘विचारांना’ अडचण होईल, अशी भिती तर त्यांना वाटत नाही ना, असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. 

लक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध

कोकणात येणारा लक्ष्मी ऑरगॅनिक्स या इटली मधील घातक प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा विरोध असून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. इटलीमध्ये बंद पडलेल्या या केमिकल कंपनीचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे कोकणातील पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्ष हा प्रश्न विधिमंडळातही उपस्थित करणार आहे व कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असे स्पष्ट करताना, कोकणातील मंत्री या प्रकल्पाविरोधात आवाज का उठवत नाहीत. दररोज हिंदु-मुस्लीम वाद उभा करण्यासाठी तोंड उघडणारे मंत्री लक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रकल्पाबाबत गप्प का आहेत, अशी विचारणाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चिपळूण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी रक्षा स्मारकाला भेट दिली. यावेळी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून युगात्मा हे मंगेश पाडगावकर यांनी संपादित केलेले दुर्मिळ पुस्तक भेट दिले. यावेळी श्री ग्रामदेव जुना काळभैरव मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या श्री भवानी देवीचे दर्शन घेतले. छत्रपती संभाजी महाराज यांनी वास्तव्य केले , त्या पवित्र वाड्याला भेट देऊन अभिवादन केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sambhaji Maharaj Memorial: When will the announcement be implemented?

Web Summary : Harshvardhan Sapkal questions the delay in building the Sambhaji Maharaj memorial, criticizing the ruling government. He also opposes the Lakshmi Organics project, citing environmental concerns, and supports related protests. Congress will raise the issue in legislature.
टॅग्स :congressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळkonkanकोकण