शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्राने निष्ठावंत नेता गमावला- राजेंद्र दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 10:48 PM

शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून पतंगरावांची वेगळी ओळख होती.

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं आज मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. पतंगराव कदम यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून पतंगरावांची वेगळी ओळख होती. १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांच्या काळात आमदार आणि मंत्री म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा योग मला आला. अडचणीच्या वेळी ही वातावरणातील तणाव कमी करून हास्य फुलवण्याचे अनोखे कसब त्यांच्याकडे होते. ते औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळीही त्यांचा माझा जवळचा संबंध आला. शिक्षण आणि सहकार या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय असे काम केले आहे. उद्योगमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम ही नोंद घेण्याजोगे आहे. त्यांच्या जाण्यामुळे एक निष्ठावंत नेत्याला काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र  मुकला आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायचो, तेव्हा ते बाबूजींच्या म्हणजे जवाहरलालजी दर्डांच्या अनेक आठवणी सांगायचे. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राने कायम हसतमुख असणारा नेता गमावला आहे, अशी भावना लोकमत वृत्तसमूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली आहे. 

 

पतंगराव कदम यांचा प्रवास थक्क करणारासांगली जिल्ह्यातील सोनसळ या लहान खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात पतंगरावांचा जन्म झाला. गावात चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे कुंडलला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे गाठले. द्विपदवीधर झाले. शिक्षक झाले. एकशिक्षकी शाळेत काम केले. नंतर त्यांनी तेथेच १० मे १९६४ रोजी भारती विद्यापीठाची स्थापना केली. या संस्थेचे ते तहहयात कुलपती होते. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपडणारे पतंगराव १९८० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आणि अडीचशे मतांनी पराभूत झाले. १९८५ मध्ये त्यांनी पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा ते निवडून आले. 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमcongressकाँग्रेसRajendra Dardaराजेंद्र दर्डा