पुणे वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे ‘लोकमत’ला अभिनंदनपर शुभेच्छा!
By Admin | Updated: August 5, 2016 00:27 IST2016-08-05T00:26:35+5:302016-08-05T00:27:02+5:30
पुण्यात लोकमत क्रमांक १ चे दैनिक झाल्याबद्दल १ आॅगस्ट रोजी पहाटेपासूनच विक्रेत्यांचा आनंदोत्सव सुरू होता.

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे ‘लोकमत’ला अभिनंदनपर शुभेच्छा!
पुण्यात लोकमत क्रमांक १ चे दैनिक झाल्याबद्दल १ आॅगस्ट रोजी पहाटेपासूनच विक्रेत्यांचा आनंदोत्सव सुरू होता. वितरण केंद्रावर विक्रेत्यांकडून पेढे वाटले जात होते. दुपारी वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लॉ कॉलेज रस्त्यावरील ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन पुण्यात प्रथम क्रमांकाचे दैनिक झाल्याबद्दल संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांचा पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे आणि विविध सेंटरच्या विभागप्रमुखांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी अरुण तांबे, सचिन मुंगारे, अतुल पारगे, संतोष श्रंगारे, प्रशांत गणपुले, अरुण निवंगुणे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, बजरंग लोहार, यशवंत वाधवणे, सहायक महाव्यवस्थापक (वितरण) अमित राठोड, अतुल अवचट, चेतन गणपुले, केदार मारणे, विनायक वाळके, पंडित मोकर व अमित जाधव.
‘लोकमत’ची मेहनत आणि त्याला मिळालेली विक्रेत्यांची साथ यांमुळेच पुण्यात ‘लोकमत’ नंबर १ झाला आहे. ‘लोकमत’ने नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. ‘लोकमत’ची आणि त्यासोबत वृत्तपत्र विक्रेत्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, ही शुभेच्छा.
- विजय पारगे, अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ
‘लोकमत’ पुण्यात नंबर १ होणार हे माहीतच होते. याचे कारण म्हणजे वाचकांची नस ‘लोकमत’ने पकडली आहे. समाजातील सर्व स्तरांतील बातम्या केवळ ‘लोकमत’मध्येच येत असतात. वृत्तपत्र विक्रेता बांधवांनाही ‘लोकमत’ने आपल्या परिवाराचाच घटक मानले आहे.
- अरुण निवंगुणे, सचिव, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ