शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्यात चक्क स्मशानभूमीत होणार विवाह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 14:59 IST

उद्या अक्षता सोहळा; मंडप उभारणीचे काम सुरू, तयारी अंतिम टप्प्यात

ठळक मुद्देगेल्या अडीच वर्षांपासून लक्ष्मण घनसरवाड यांचे कुटुंबीय  स्मशानभूमीत वास्तव्यास आहेतलक्ष्मण घनसरवाड यांनी मामाच्या मुलाला मुलगी दिल्यामुळे या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबासह पै-पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्टांची १०० वºहाडींचीच उपस्थिती राहणार लक्ष्मण घनसरवाड यांनी शहरातील मान्यवरांना पत्रिका देण्याचे टाळून हा घरगुती विवाह सोहळा करण्याचे नियोजन केले

अरुण लिगाडे

सांगोला : स्मशानभूमी म्हटलं की, कोणीही घाबरल्याशिवाय राहणार नाही हे वास्तव आहे, परंतु जर एखादा विवाह सोहळा स्मशानभूमीत होत असेल तर कोणालाही आश्चर्य वाटायला नको. असाच एक विवाह सोहळा १९ रोजी सकाळी १०़४५ च्या मुहूर्तावर सांगोल्यातील स्मशानभूमीत होत आहे.  

मूळचे आंध्रप्रदेश (जलालपूर, निजामाबाद) येथील व बीडचे रहिवासी लक्ष्मण राजाराम घनसरवाड हे कुटुंब २०१७ साली सांगोल्यात आले. नगरपालिकेने त्यांना मसनजोगी म्हणून नियुक्त केले. गेल्या अडीच वर्षांपासून लक्ष्मण घनसरवाड यांचे कुटुंबीय  स्मशानभूमीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबाचा दैनंदिन जीवनचरित्र स्मशानभूमीतच चालतो. लक्ष्मण घनसरवाड हे जरी मसनजोगीचे काम करीत असले तरी त्यांचा मुलगा सुदर्शन १२ वी तर हर्षदीप ७ वीत आहे़ मुलगी पूजा हिने डी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अनुराधा बी.एस्सीचे व जयश्री १० वीचे शिक्षण घेत आहे.

दरम्यान, लक्ष्मण घनसरवाड यांची मोठी मुलगी पूजा हिचा विवाह मनाठा (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील सुभाष गोविंद सागवाने यांचा मुलगा संतोष (बी. फार्मसी) याच्यासमवेत जुळून त्यांचा १३ मे रोजी बीडमध्ये साखरपुडा झाला होता; मात्र विवाह सोहळ्याची तारीख निश्चित झाली नव्हती. लक्ष्मण घनसरवाड व सुभाष सागवाने यांनी १० दिवसांपूर्वी विवाह सोहळ्याचे नियोजन करुन १९ जुलै रोजी विवाह करण्याचे नियोजन केले. लक्ष्मण घनसरवाड यांनी मामाच्या मुलाला मुलगी दिल्यामुळे या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबासह पै-पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्टांची १०० वºहाडींचीच उपस्थिती राहणार आहे; मात्र लक्ष्मण घनसरवाड यांनी शहरातील मान्यवरांना पत्रिका देण्याचे टाळून हा घरगुती विवाह सोहळा करण्याचे नियोजन केले आहे.

मंडप उभारणीचे काम सुरु- विवाह सोहळ्यासाठी वाढेगाव रोडवरील स्मशानभूमीतच ३० बाय ४० चा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे़ विवाह सोहळ्यासाठी येणाºया वºहाडी मंडळींना शिरा, भात, भाजी, चपाती असा जेवणाचा मेनू ठेवला आहे. विवाह सोहळ्यात वधू-वर पक्षाकडून रितीरिवाजाप्रमाणे मानपान होणार आहे़ या विवाहाचा होणारा खर्च वधू-वर पक्षाच्या पित्याकडून निम्मा निम्मा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़ शुक्रवारी हळदी असल्याने मुलीच्या हातावर मेहंदी काढण्यात आली आहे़ शिवाय त्याच दिवशी हळदीचा कार्यक्रम होईल़ या निमित्ताने पाहुणे रेल्वेने येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नNashikनाशिक