"नीट"चा गोंधळ, 200 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

By Admin | Updated: May 7, 2017 10:27 IST2017-05-07T10:13:32+5:302017-05-07T10:27:47+5:30

नीट परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर चुकीचा पत्ता असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. सीबीएसईच्या घोळामुळे सुमारे 150 ते 200 विद्यार्थांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

The confusion of "neat", the fate of 200 students is in the future | "नीट"चा गोंधळ, 200 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

"नीट"चा गोंधळ, 200 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 7 -  नीट परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर चुकीचा पत्ता असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. सीबीएसईच्या घोळामुळे सुमारे 150 ते 200 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. 
 
येथील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर मुंढेगाव असा उल्लेख असल्याने सकाळी अनेक विद्यार्थी ईगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे पोहोचले. सकाळी 9.30 वाजता सुरू होणा-या परिक्षेसाठी विद्यार्थी तेथे पोहोचले परंतू तेथे कोणतेही परीक्षा केंद्र नसल्याचे समजल्याने धक्का बसला. त्यांनी धावपळ करुन पत्यातील इतर सुचनांनुसार पेठरोडचे एकलव्य स्कूल येथील परीक्षा केंद्र गाठले. येथे पोहोचायला त्यांना उशीर झाल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला. या प्रकारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Web Title: The confusion of "neat", the fate of 200 students is in the future