शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी टाळला संघर्ष; सभागृहात गोंधळ घातला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 08:26 IST

तणावाऐवजी शांतता, शिवसेनेत आजवर झालेल्या सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आजचे अधिवेशन होत असतानाही विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये एकाही प्रसंगात हमरीतुमरी झाली नाही.

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आमनेसामने येऊन तणाव निर्माण होईल, असे म्हटले जात असताना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी संघर्ष, वाद करण्याचे टाळले. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली. 

शिवसेनेत आजवर झालेल्या सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आजचे अधिवेशन होत असतानाही विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये एकाही प्रसंगात हमरीतुमरी झाली नाही. सभागृहाच्या बाहेर वा सभागृहातही दोन्ही गटांतील आमदारांनी एकमेकांशी कोणताही संवाद साधला नाही. इतक्या वर्षांमध्ये दोन्ही बाजूंचे आमदार एकाच पक्षात एकाच नेतृत्वाखाली काम करीत होते. इतक्या वर्षांचा ऋणानुबंध राहिला आहे, पण आज दोन गटांतील आमदार एकमेकांशी बोलणे तर सोडाच, पण बघतदेखील नव्हते. शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार आणि भाजपचे सगळे आमदार भगवे फेटे घालून आले होते. जय भवानी, जय शिवाजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय श्रीरामच्या घोषणा शिंदे गट आणि भाजपचे आमदार देत होते. त्या मानाने ठाकरे गटातील आमदार शांत बसले होते. तीन तासांच्या अधिवेशनात तावातावाने एकदाच बोलले ते शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव. मात्र, समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केल्याबद्दल टीका सुरू केल्याने जाधव भडकले. त्या वादाला शिवसेनेतील वादाचा संदर्भ नव्हता. दोन्ही गटांतील आमदार वेलमध्ये उतरले, एकमेकांच्या अंगावर धावून गेले असा कोणताही प्रसंग उद्भवला नाही. 

सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच आमने-सामने    शिवसेनेत गेले काही दिवस प्रचंड तणाव आहे. इतके दिवस बाहेर असलेले शिंदे गटाचे आमदार मुंबईत परतल्यानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे गटाच्या आमदारांसमोर आले, पण दोन्ही बाजूंनी मर्यादांचे पालन करत सभागृहातील वातावरण बिघडू दिले नाही. बाहेर कितीही वाद असले तरी त्याचे पडसाद सभागृहात उमटणार नाही याची काळजी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी घेतली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे