शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुनामियाच्या मोबाइलमध्ये गृहविभागाची गोपनीय फाईल, बिल्डरची तक्रार; सायबर पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 09:02 IST

या प्रकरणाचा तपास  विशेष पथकाकडून (एसआयटी) सुरू करण्यात आला होता. यादरम्यान एसआयटीच्या चौकशीत पुनामियाच्या व्हॉटस्ॲप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली.

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि खंडणीच्या गुह्यात अटकेत असलेले संजय पुनामिया यांच्या मोबाइलमध्ये गृहविभागातील २७ पानांची गोपनीय फाईल सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मध्य विभाग सायबर सेलने स्वतंत्र गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. परमबीर सिंहांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही फाईल चोरल्याचा संशय पोलिसांना आहे. 

भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सिंह यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात जैन आणि पुनामिया यांना अटक झाली आहे. 

या प्रकरणाचा तपास  विशेष पथकाकडून (एसआयटी) सुरू करण्यात आला होता. यादरम्यान एसआयटीच्या चौकशीत पुनामियाच्या व्हॉटस्ॲप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली. ३ मे २०२१ रोजी पुनामियाने २७ पानांची फाईल त्यांचा मुलगा सनी पुनामिया याला मोबाइलवरून पाठविल्याचे समोर आले. गृहविभागाच्या या फाईलमध्ये गोपनीय असा शेरा होता. त्यामुळे माहिती अधिकारातही अशी फाईल उपलब्ध होणे शक्य नसल्यामुळे पुनामियाने ही फाईल चोरल्याचा संशय आहे. 

फाईलमध्ये काय आहे? या फाईलमध्ये काही पत्रव्यवहार झाल्याच्या गोपनीय कागदपत्रांचा समावेश आहे. या पत्रव्यहारामध्ये पोलीस अधीक्षक, सीबीआय, नवी दिल्ली यांनी गृहविभाग आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना एका चौकशीसंबंधित माहिती मागविली होती. ८ एप्रिल आणि १५ एप्रिलच्या दोन पत्रांचा यात समावेश आहे. यावर ९ एप्रिल आणि १८ एप्रिलदरम्यान गृहविभागाने पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये कागदपत्रांवर गोपनीय असा शेरा आहे. त्यामुळे एका चौकशी प्रकरणातील गोपनीय कागदपत्रे लीक कशी झाली, याबाबत अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी