शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र संरक्षणाबाबत ‘एनटीसीए’त चिंता, १२ आशियाई देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 16:32 IST

देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे.

 अमरावती  - देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. भारतातीलजंगलाच्या तुलनेत १० ते १५ हजार वाघांचे सहजतेने संवर्धन होऊ शकते, असा अभ्यासपूर्ण आढावा सादर करण्यात आला आहे. एनटीसीएच्या पुढाकाराने दिल्ली येथे २८ व २९ जानेवारी रोजी व्याघ्र संवर्धन करणाºया १२ आशियाई देशाच्या प्रतिनिधींची तिसरी स्कॉक टेकींग परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. थायलंड, कोलंबिया, व्हिएतनाम, रशिया, इंडोनेशिया, भूतान, कंबोडीया, मलेशिया, मॅनमार्क, लायोस, नेपाळ व भारत देशाचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. यात व्याघ्र अभ्यासक विलास कारंभ, राजेश गोपाल, वाय. झाला यांनी देशातील वाघ संवर्धनाविषयी चिंता वर्तविल केली.महाराष्ट्रातून पेंच व्याघ्र प्रकल्पातून रामाराव, रवि गोवेकर, सह्यांद्रीचे गुजर यांची उपस्थिती होती. चीन वगळता अन्य १२ आशियाई देशाचे प्रतिनिधींनी सन- २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याविषयी मते वजा आढावा सादर केला. जगातील एकूण वाघांपैकी ५७ टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. त्यामुळे भारताला 'व्याघ्रभूमी' असे संबोधले जाते. मात्र, अलीक डे वाघांचे संरक्षण, संवर्धनाचा विषय ऐरणीवर आला आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांचे संचार चिंताजनक असल्याची बाब या परिषदेत मांडली गेली. भारतात वाघांच्या संख्येनुसार वन्यजीवांचे व्यवस्थापन योग्यप्रकारे होत नाही. देशात सन २०१४ मध्ये २,२६६ वाघांची संख्या होती. आता ती अडीच ते तीन हजांरांवर पोहचली आहे. व्याघ्रांचे संवर्धन, संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी वन्यजीव व्यवस्थापन महत्वाचे असल्याबाबतचे मत परिषदेतून मांडल्या गेले. चीनमध्ये वाघ अवयांची तस्करी होत असल्याची बाब अन्य आशियाई देशांच्या प्रतिनिधींनी मांडली आहे.      व्याघ्रांच्या संवर्धनाविषयी परिषदेत या मुद्द्यावर मंथन- व्याघ्रांचे संचार मार्ग धोकादायक- मानव -वन्यजीव संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजना - व्याघ्र अवयवांची तस्करी रोखणे- शिका-यांवर अंकुश मिळविणे- वन्यजीव व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणे- व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांचे संरक्षण      व्याघ्रभूमी अशी भारताची ओळख आहे. मात्र, वाघांचे मृत्यू, शिकारी, अवयवांची तस्करी या घटनांमध्ये वाढ होत आहे. भारत वगळता अन्य आशियाई देशांनी सन २०२० पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा मानस केला आहे. देशात वन्यजीव व्यवस्थापनात उणिवा आहेत.- यादव तरटे पाटील,  वन्यजीव अभ्यासक, अमरावती

टॅग्स :TigerवाघforestजंगलMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत