शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

नवदुर्गा उत्सवातून स्त्री सक्षमीकरणाचा पायंडा

By admin | Updated: October 10, 2016 12:07 IST

२८ वर्षांपासून प्रबोधनाचा वारसा जोपासणा-या सोनू क्रीडा मंडळाने यावर्षी महिलांवर होणारे अत्याचार व मुलींची कमी होणारी संख्या यावर प्रकाश टाकला आ

रलीधर चव्हाण, ऑनलाइन लोकमत
मोताळा (बुलडाणा), दि. १० - २८ वर्षांपासून प्रबोधनाचा वारसा जोपासणा-या सोनू क्रीडा मंडळाने यावर्षी महिलांवर होणारे अत्याचार व मुलींची कमी होणारी संख्या यावर प्रकाश टाकला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत स्त्री सक्षमीकरणाचा पायंडा या मंडळाने पाडला असून, प्रबोधनाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाºया हजारो भाविकांना यापासून प्रेरणा मिळत आहे.
शहरातील जुना गाव परिसरात काही तरूणांनी २८ वर्षापूर्वी एकत्र येत जय दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना केली होती. त्यावेळी मनोरंजनाची साधने कमी असल्यामुळे दुर्गोत्सवाच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रम मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांच्यावतीने आयोजित करण्यात येत होते. तीच परंपरा येणाºया दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी
कायम ठेवली. त्यामुळे जय दुर्गा उत्सव मंडळाचा उत्सव मोताळा परिसरातील नागरिकांसाठी पर्वणी असतो. यावर्षीही मंडळाने मुलींची कमी होणारी संख्या ह्या राष्ट्रीय समस्येला देखाव्यातून वाचा फोडली आहे. संपूर्ण मंडळ परिसरात विविध प्रकारचे लेक शिकवा, लेक जगवा, बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी व्यापक सामाजिक जनजागृती करण्यासाठी डीजिटल बॅनर लावले
आहेत. या जनजागृतीतून दर्शनासाठी येणाºया प्रत्येक भाविकांपर्यंत हा संदेश जात आहे. शिवाय दुर्गोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील लहान-मोठयांना  एकत्र आणून विविध स्पर्धेत सहभागी करूण घेणे, भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करून सर्वाना आनंदात सहभागी करून घेणे असा कार्यक्रम नऊ दिवस चालतो. मंडळात नवीन सदस्य आले मात्र; विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वाना एकत्रा आणण्याचा प्रयत्न जय दुर्गा उत्सव मंडळ करीत आहे. शुक्रवारी निराधार वृद्ध महिलांना मान्यवरांच्या हस्ते लुगडे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावर्षी स्थापन करण्यात आलेल्या दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमा कानडे, उपाध्यक्ष निलेश किरोचे, कोषाध्यक्ष गजानन चित्रंग, सदस्य निखील जैस्वाल,  भुषण वानखेडे, विशाल झाल्टे, वरूण असोलकर, नितीन इंगळे, अक्षय क्षिरसागर आदी सदस्य आहेत. यावर्षीही विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, प्रोत्साहनपर बक्षीस ठेवण्यात आले आहे.