शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बँकेसह शैक्षणिक कामासाठी एकच ‘कॉम्बो कार्ड’, संजय पाटील यांची संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 08:15 IST

- भूषण रामराजे  नंदुरबार : विद्यार्थ्यांकडील ओळखपत्र आणि बँकेचे डेबिट कार्ड एकत्रित करण्याचा अनोखा प्रयोग पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) व स्टेट बँकेने एकत्र येऊन राबवला आहे. या ‘कॉम्बो कार्ड’ची मूळ संकल्पना आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी डॉ एस एल पाटील यांची. शहादा तालुक्यातील भादा येथील मूळ रहिवासी असलेले प्रा डॉ ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडील ओळखपत्र आणि बँकेचे डेबिट कार्ड एकत्रित करण्याचा अनोखा प्रयोग पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) व स्टेट बँकेने एकत्र येऊन राबवला आहे. ‘कॉम्बो कार्ड’ची मूळ संकल्पना आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी डॉ एस एल पाटील यांची.

- भूषण रामराजे  

नंदुरबार : विद्यार्थ्यांकडील ओळखपत्र आणि बँकेचे डेबिट कार्ड एकत्रित करण्याचा अनोखा प्रयोग पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) व स्टेट बँकेने एकत्र येऊन राबवला आहे. या ‘कॉम्बो कार्ड’ची मूळ संकल्पना आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी डॉ एस एल पाटील यांची. शहादा तालुक्यातील भादा येथील मूळ रहिवासी असलेले प्रा डॉ संजय लिमजी पाटील हे शासकीय पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता आहेत़ इन्स्ट्रूमेंटेशन हा त्यांचा विषय.

विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत त्यांनी बँक आणि महाविद्यालय अशा दोन्ही ठिकाणी उपयोगी पडेल, असे एकच कार्ड तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता़ स्टेट बँकेने त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरत विद्यार्थ्यांना कार्ड देण्याबाबत अनुकूलता दर्शवली.बँकेच्या व्यवहारांसाठी देण्यात येणाऱ्या या डेबिट कार्डमध्ये विद्यार्थ्यांची माहिती असलेली चीप टाकण्यात आली आहे. कार्डवर विद्यार्थ्यांचे छायाचित्र, त्याचा क्रमांक, रक्तगट आदी माहितीही देण्यात आली आहे. बँकेचे व्यवहार आणि महाविद्यालयातील शैक्षणिक कामे यासाठी आता एकाच कार्डचा वापर करता येणार आहे.

या कार्डात विद्यार्थ्यांचे नाव, क्रमांकासहित त्याची माहिती यावर आहे. तसेच ग्रंथालयात पुस्तक देवाण-घेवाणीसाठी विद्यार्थ्यांची ओळख पटावी, म्हणून या कार्डमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी चीप बसविण्यात आली आहे. ग्रंथालयात गेल्यानंतर आरएफआयडी चीप रीडरद्वारे विद्यार्थ्यांची सर्व माहिती मिळू शकेल. महाविद्यालयातील प्रयोगशाळा, तसेच दरवाजा उघडण्यासाठीही याचा उपयोग होईल, असा दावा पाटील यांनी केला आहे.

१२०० विद्यार्थ्यांना कार्डचे वाटप४महाविद्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने १२०० विद्यार्थ्यांना या कॉम्बो कार्डचे वाटप करण्यात आले आहे़ बाजारपेठेत कोठेही असलेल्या पीओएस मशीनमध्ये हे कार्ड टाकल्यास विद्यार्थ्यांना व्यवहार करता येतील.

हे कॉम्बो कार्ड आर्थिक व्यवहार आणि शैक्षणिक कामकाजासाठी वापरता येईल. यातील आरएफआयडी चीप सीओईपीची असणार आहे.- डी.बी.बी. आहुजा, संचालक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

‘डेबिट कार्डवरच ओळखपत्र करता आले तर, हा विचार पुढे आला आणि स्टेट बँकेच्या अधिकाºयांबरोबर यासंबंधी चर्चा केली. त्यांनी महाविद्यालयाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार कार्डमध्ये बदल केले आणि एकच कार्ड तयार केले आहे. त्याचा उपयोग एटीएममधून पैसे काढण्याबरोबरच कँटीनमधील बिल देण्यासाठी होणार आहे़ याशिवाय महाविद्यालयातील शैक्षणिक कामासाठीही ते उपयोग करता येईल.- प्रा.डॉ. एस एल पाटील