शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही; विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 06:36 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले की, पुढची कारवाई योग्य कायदेशीर सल्ला घेऊन केली जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आमदार अपात्रतेबाबत सुनावणीसाठी वेळापत्रक जाहीर करा आणि दोन महिन्यात निर्णय घ्या, असा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाशी मी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ देणार नाही. कोर्टाने दिलेल्या आदेशांचा मी योग्यरीत्या आदर ठेवत विधिमंडळाचे सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी कार्यवाही करेन, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शनिवारी स्पष्ट केले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले की, पुढची कारवाई योग्य कायदेशीर सल्ला घेऊन केली जाईल. कोण, काय म्हणते याकडे मी लक्ष देत नाही. न्यायालयाच्या आदेशात जे लिहिलेले आहे, त्याबद्दल मी दखल घेतो. पण आज जी प्रत माझ्या हाती आहे, ती ऑनलाइनही उपलब्ध आहे. ती तुम्ही वाचून पाहा. त्यात कुठेही कोर्टाने माध्यमांनी म्हटल्यानुसार किंवा इतरांकडून जी टीकाटिप्पणी केली जातेय, तसे आदेशात म्हटलेले नाही. 

हे तर माझे कर्तव्यच...मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या संविधानात न्याय मंडळ, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ या तिघांनाही समान स्थान दिलेले आहे.कोर्टाचा आदर ठेवणे किंवा संविधानातून निर्माण झालेल्या इतर संस्थांचा आदर ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.  ज्याचा संसदीय लोकशाहीवर विश्वास आहे तो निश्चितपणे संविधानाने निर्माण केलेल्या या संस्थांचा मान राखेल. माझा संविधानावर पूर्ण विश्वास असल्यामुळे कोर्टाच्या आदेशाच मान राखणे हे माझे कर्तव्य आहे. ते मी पार पाडणार आहे, असेही नार्वेकर म्हणाले.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना