शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 04:39 IST

शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणेंसह आतापर्यंतच्या आंदोलनात बळी पडलेल्या सहा हुतात्मांना श्रद्धांजली वाहून ठिकठिकाणी मुक निदर्शने केली.

ठाणे : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदमधून ठाणे जिल्हा शाखेने माघार घेतली असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी काश्मीरमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणेंसह आतापर्यंतच्या आंदोलनात बळी पडलेल्या सहा हुतात्मांना श्रद्धांजली वाहून ठिकठिकाणी मुक निदर्शने केली. यावेळी अनेक ठिकाणी सरकारचा निषेधही केला. म्हारळ येथे कल्याण-नगर मार्गावरील अर्ध्यातासाचा रास्तोरोको वगळता कुठेही आंदोलन झाले नाही.अलिबाग : रायगड जिल्ह्यात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बंदच्या निमित्ताने कोणावरही जबरदस्ती करण्यात आली नव्हती, मात्र जिल्ह्यातील अनेक मोठ्या बाजारपेठा व्यापाऱ्यांनी स्वेच्छेनेच बंद ठेवून समर्थन दर्शवले. परिणामी जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडले नाहीत. मात्र, गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव, महाड आणि पोलादपूर येथे रास्ता रोको करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दुपारी एकच्या सुमारास ती पूर्ववत झाली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील सर्व व्यावसायिकांनी बंदला पाठिंबा देऊन व्यवसाय बंद ठेवले.पालघर : बंदच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी एसटीने खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या अनेक फेºया रद्द केल्या होत्या. या विभागातील ८ आगारातून २२८ फेºया रद्द झाल्याने ८९,३,०४४ इतक्या रूपयांचे एसटीचे नुकसान झाले. जिल्हयामध्ये सर्वत्र शांतता होती. विरारमध्ये फक्त काही आंदोलक आणि रिक्षा चालक यांच्यात बाचाबाची झाली.नवी मुंबई : बंदमधून नवी मुंबई शहर वगळण्यात आले होते. कोपरखैरणेचा काही भाग वगळता दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. सायन-पनवेल महामार्गावर शुकशुकाट होता.>आंदोलनाला प्रतिबंध घालण्यासाठी याचिकामुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला प्रतिबंध घालण्यात यावा व हिंसाचार करणाºयांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका शेतकरी द्वारकानाथ पाटील यांनी उच्च न्यायालयात दखल केली आहे़ यावर १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे़

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण