शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण माहिती संकलनाचे ६०% काम पूर्ण, मागासवर्गीय आयोगाकडून वेळापत्रक तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 05:08 IST

मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या माहिती संकलनाची प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (बार्टी) राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे.

पुणे - मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या माहिती संकलनाची प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (बार्टी) राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. माहिती संकलनाचे सुमारे ५० ते ६० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील चार ते पाच दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल तीन महिन्यांत तयार केला जाणार आहे. त्यासाठीच्या विविध टप्प्यांचे वेळापत्रक आयोगाने तयार केले आहे. त्यानुसार बार्टीमध्ये आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीचे संकलन करण्यात आले. तसेच माहिती संकलनाची कार्यपद्धती निश्चित करून त्या दृष्टीने ‘डेटा एंट्री’ केली जात आहे. आयोगाचे सदस्य स्वत: उपस्थित राहून अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती योग्य प्रकारे संकलित करत आहेत.आरक्षणासंदर्भातील अहवालाचे अंतिम लिखान करण्यापूर्वी संबंधित माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलित केली जात आहे. सध्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या आणि आरक्षणाचा लाभ न मिळणाºया घटकांमधील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक तफावत आयोगाकडून तपासली जात आहे. पुढील चार ते पाच दिवसांत अहवालासाठी अपेक्षित ‘डेटा एंट्री’ पूर्ण होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.आणखी दोन आत्महत्याबीड/औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठवाड्यात बीड व आणखी दोघांनी आत्महत्या केल्या. बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील राहुल पद्माकर हावळे (२०) याने विषप्राशन करुन आत्महत्या केली. बीड जिल्ह्यातील ही सातवी आत्महत्या आहे. तर औरंगाबादला केशव साहेबराव चौधरी (५५) यांनी सोमवारी दुपारी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये मदत व कुटुंबातील सदस्यास पात्रतेनुसार नोकरी देण्यात येईल, असे पत्र उपविभागीय अधिकाºयांनी कुटुंबियांना दिले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र