शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 13:36 IST

Lok Sabha Election 2024 : दत्ता भरणे यांच्या धमकीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना लोकसभेला होत आहे. यामुळे हा मतदारसंघ महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात आमदार दत्ता भरणे यांच्यावर मतदारांना धमकी दिल्याचा आरोप आहे. दत्ता भरणे यांच्या धमकीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दत्ता भरणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे दत्ता भरणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, दत्ता भरणे त्यांच्या गावातील आणि आसपासमधील गावातील लोकांना शिवीगाळ करून धमकावत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. 

दत्ता भरणे यांचा हा धमकीचा व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे कार्यकर्त्यांना बोलत असल्याचे दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पवार यांनी भरणेंवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भरणे यांनी स्पष्टीकरण दिले होते. मी दोन कार्यकर्त्यांमधील वाद सोडवत होतो, असे स्पष्टीकरण भरणे यांनी दिले.

रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये काय?"केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!"

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेbaramati-pcबारामतीRohit Pawarरोहित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग