बच्चू कडूंविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत तक्रार

By Admin | Updated: June 10, 2017 03:00 IST2017-06-10T03:00:33+5:302017-06-10T03:00:33+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर बॉम्ब टाकू, असे वक्तव्य करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुरुवारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी

Complaint against various police stations against Bachu Kadu | बच्चू कडूंविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत तक्रार

बच्चू कडूंविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर बॉम्ब टाकू, असे वक्तव्य करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुरुवारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदविल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
प्रहारचे आ. बच्चू कडू यांच्या या दहशतवादी वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या तक्रारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली, राजापेठ, गाडगेनगर, बडनेरा, नांदगाव पेठ, नागपुरी गेट, खोलापुरी गेट, फे्रजरपुरा या ठाण्यांत दिल्या आहेत.

Web Title: Complaint against various police stations against Bachu Kadu