संजय राऊतांसह दोघांविरोेधात पोलिसांत तक्रार

By Admin | Updated: September 28, 2016 21:29 IST2016-09-28T20:57:17+5:302016-09-28T21:29:39+5:30

सामनाच्या रविवारच्या पुरवणीमध्ये मराठा क्रांती मोर्चाबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र छापल्याप्रकरणी राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

Complaint against Sanjay Raut and police both | संजय राऊतांसह दोघांविरोेधात पोलिसांत तक्रार

संजय राऊतांसह दोघांविरोेधात पोलिसांत तक्रार

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 28 - सामनाच्या रविवारच्या पुरवणीमध्ये मराठा क्रांती मोर्चाबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र छापल्याप्रकरणी राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी बुधवारी दुपारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या एका कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी सामनाचे संपादक संजय राऊत आणि कार्टून काढणारे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक अनिल आढे म्हणाले की, गारखेडा परिसरातील गजानननगर येथील रहिवासी रवींद्र काळे यांनी याविषयी तक्रार दिली आहे. सामना मध्ये मराठा क्रांती मोर्चासंदर्भात कार्टून प्रसिद्ध केले आहे.

मराठा समाजातील स्त्री, पुरुषाची बदनामी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीत त्यांनी सामनाचे संपादक संजय राऊत आणि कार्टून काढणारे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची नोंद भादंवि ५०५ प्रमाणे घेण्यात आली आहे. हा अदखलपात्र गुन्हा असल्याचे पो. नि. आढे यांनी सांगितले.

Web Title: Complaint against Sanjay Raut and police both