शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संघाची लष्कराशी तुलना, भागवतांचं थंडीतील उबदार स्वप्न!!! राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 18:34 IST

जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे.

मुंबई - जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे. संघाची लष्कराशी तुलना म्हणजे भागवत यांनी थंडीच्या दिवसांमध्ये पाहिलेले उबदार स्वप्न असून,  भागवत आणि संघ स्वयंसेवकांना नियंत्रण रेषेवर पाठवले तर त्यांच्याकडील दंडुका आणि बौद्धिक घेणारी पुस्तके पाहून पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी पसार होतील, असा टोला राज ठाकरे यांनी हाणला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांनी जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघ तीन दिवसांत करेल, असा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतीय लष्करासोबक तुलना केली होती. त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आजच्या व्यंगचित्रासाठी तोच विषय निवडून राज ठाकरे यांनी संघ आणि सरसंघचालकांचा समाचार घेतला.  या व्यंगचित्रामध्ये सरसंघचालक मोहन भागवत हे झोपेत स्वप्न पाहत असून, त्यात ते  सीमेवर दंडुका घेऊन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना दरडावताना दाखवले आहे. " क्या है रे इकडे, चलो पलिकडे, दंडुका देखा नही क्या हमारा, एक एक को पुस्तक फेक फेक के मरेगा, समजलं क्या?" असे भागवत म्हणत असून, त्यांचा तो आवेश पाहून  पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी भागो भागवत आया, असे ओरडत पळताना दिसत आहेत.  दरम्यान, याआधीच्या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांचा समाचार घेतला होता. या व्यंगचित्रात अहो, कधी तरी आमच्याही छकुल्याचं कौतुक करा ना, असा मोदी मनमोहन सिंगांना सांगताना दाखवण्यात आले होते. त्यावर मनमोहन सिंगांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीजी, नक्की केले असते पण त्यात नुसताच पेंढा भरलाय, असं उत्तर मनमोहन सिंग यांनी दिलं आहे. व्यंगचित्रातून मोदी हातातून बाबागाडी घेऊन जात असताना पेंढ्याच्या स्वरूपात एक प्रतीकात्मक बाहुलं दाखवण्यात आलं आहे. त्या पेंढ्यानं भरलेल्या योजनारूपी बाहुल्याला जाहिरातबाजीचं विशेषण लावण्यात आलं आहे. तर मोदींच्या मागे अमित शाह खेळणी घेऊन चालताना दाखवण्यात आले आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेCartoonistव्यंगचित्रकारMNSमनसेMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ