शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत ३० दिवसांत ५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:10 IST

Majhi Ladki Bahin Yojana:: डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली.

Majhi Ladki Bahin Yojana: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात आणली. या योजनेच्या माध्यमातून महायुतीने जोरदार प्रचार करत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र निकालानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेवरून बरीच चर्चा सुरू आहे. नुकतेच महिला विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात जानेवारी महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता देण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत हा आकडा तब्बल ५ लाखांनी कमी आला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचं बोललं जात होते. त्यानंतर या योजनेचा फेर आढावा घेण्यात आला. त्यातून अपात्र असणाऱ्या महिलांना वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली. लाडकी बहीण योजनेतून कमी झालेल्या ५ लाख बहि‍णींपैकी अनेकांचे वय ६५ वर्षाहून अधिक झाल्यानं त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेतील अटीनुसार २१ ते ६५ वयोगटातीलच महिलांना महिन्याला १५०० रूपये देण्यात येतात.

काय कारणे आहेत?

दीड लाख बहि‍णींचे वय ६५ हून अधिक झाले, योजनेच्या अटीनुसार ६५ वर्षापर्यंतच योजनेचा लाभ घेता येतो२ लाख लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेतात. पुढील काळात नमो महिला सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी बहि‍णींनाही योजनेतून वगळणार असल्याची माहिती

अडीच कोटींचा आकडा ३० लाखांवर आणणार, विरोधकांचा दावा

लाडक्या बहिणीचा अडीच कोटी पर्यंत गेलेला आकडा पंचवीस ते तीस लाखावर आणण्याचे प्लॅनिंग सुरू आहे. जाहिराती देऊन लाडक्या बहिणींची दिशाभूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान घेण्याचा हा फंडा आहे असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

दरम्यान, योजनेतील नियमाप्रमाणे ६५ वर्षावरील बहि‍णींना लाभ मिळू शकत नाही. घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अनावधानाने किंवा नजरचुकीने या महिला योजनेत समाविष्ट झाल्या असतील तर त्या कमी झाल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. 

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाUday Samantउदय सामंतMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्र