शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

मराठी भाषा दिनासाठी इव्हेंट कंपन्यांचे ‘मॅनेज’मेंट, उच्चशिक्षण विभागानेच ठरविल्या कंपन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:46 IST

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांनी २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले असून स्वायत्त विद्यापीठातील कार्यक्रमांसाठी इव्हेंट कंपन्यांची निवडही स्वत:च केली आहे. थोपवलेल्या इव्हेंट कंपन्यांचे कार्यक्रम राबवणे आणि त्यांना लाखो रुपये अदा करणे विद्यापीठांवर बंधनकारक केल्याची माहिती समोर आली आहे.

राम शिनगारे औरंगाबाद : राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांनी २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले असून स्वायत्त विद्यापीठातील कार्यक्रमांसाठी इव्हेंट कंपन्यांची निवडही स्वत:च केली आहे. थोपवलेल्या इव्हेंट कंपन्यांचे कार्यक्रम राबवणे आणि त्यांना लाखो रुपये अदा करणे विद्यापीठांवर बंधनकारक केल्याची माहिती समोर आली आहे.उच्चशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या स्वाक्षरीने २० जानेवारीला सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांनी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कार्यक्रम साजरा करण्याची नियमावलीही त्यात आहे. विविध इव्हेंट कंपन्या निर्मित कार्यक्रम विद्यापीठांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी निविदाही मागविलेल्या नाहीत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दीपक मंडळ, नाशिकनिर्मित कंपनीचा ‘बोलतो मराठी’ कार्यक्रम ठेवला. त्यासाठी विद्यापीठ तब्बल १३ लाख रुपये खर्च करीत असल्याचे वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी यांनी सांगितले. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ प्रशासनाने उच्चशिक्षण विभागाची सूचना धुडकावत ५ लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित निधीत उपलब्ध होणाºया कंपनीला कार्यक्रम दिला आहे. हा नवीन विद्यापीठ कायद्याचा भंग असल्याचे जाणकारांनी ‘लोकमत’ला सांगितले.विद्यापीठ स्वायत्त संस्था असतानाही मंत्र्यांच्या आदेशामुळे इव्हेंट कंपन्यांना लाखो रुपये द्यावे लागत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले. याविषयी एकाही कुलगुरूंनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला. उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी प्रतिसाद दिला नाही.कंपन्यांची सक्ती-स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात श्री जी.आर. इमेजेस, नागपूरनिर्मित ‘कस्तुरीगंधित माय मराठी’, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अंबा फेस्टिव्हल ट्रस्ट, अमरावतीनिर्मित ‘मायमराठी’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरभी, पुणेनिर्मित ‘बोलू कवतिके’, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात लक्ष्मीकांत धोंडनिर्मित ‘वाणी अमृताची’, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नकाशे इंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मराठी आमची मायबोली’, शिवाजी विद्यापीठात अ‍ॅडफिज कंपनीनिर्मित ‘मराठीची शिदोरी’, सोलापूर विद्यापीठात निश इंटरटेनमेंट प्रस्तुत ‘ज्ञानभाषा माय मराठी’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सलील कुलकर्णी, पुणे प्रस्तुत ‘कवितेचं गाणं होताना’, गडचिरोली येथील विद्यापीठात रागरंग, अमरावतीनिर्मित ‘माझा मराठीची बोलू’ आणि मुंबई विद्यापीठात मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठान प्रस्तुत ‘मराठी नामा’ हे कार्यक्रम सादर होणार आहेत.

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2020Aurangabadऔरंगाबाद