अधिस्वीकृती समितीने घेतला नागपूरला माफसूचा आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 18:47 IST2016-08-08T18:47:33+5:302016-08-08T18:47:33+5:30
भारतीय कृषी संशोधन समितीने (आयसीएआर)पाठवलेली अधिस्वीकृती समिती (दिल्ली )महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा (माफसू)आढावा घेत असून, याकरिता

अधिस्वीकृती समितीने घेतला नागपूरला माफसूचा आढावा !
>- राजरत्न सिरसाट
अकोला, दि. 08 - भारतीय कृषी संशोधन समितीने (आयसीएआर)पाठवलेली अधिस्वीकृती समिती (दिल्ली )महाराष्ट्र
राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा (माफसू)आढावा घेत असून, याकरिता ही समिती सोमवारी नागपुरातील माफसूच्या मुख्यालयात पोहोचली आहे. मंगळवारी ही समिती अकोल्यातील स्नातकोत्तर पशू, मत्स्य व विज्ञान संस्थेत पोहोचणार असल्याने येथील इमारतीच्या रंगरंगोटीच्या कामांना वेग आला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती आयसीएआरने रद्द केल्याने माफसू खबरदारी घेत आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांचा आढावा मागील मे महिन्यात आयसीआरच्या अधिस्वीकृती समितीने घेतला होता. या आढाव्यात त्या समितीला शैक्षणिक, संशोधन व विद्यार्थ्यांना मिळणाºया सुविधा याबाबत असंख्य त्रुटी आढळल्याने मागील दोन महिन्यांपूर्वी आयसीआरने राज्यातील कृषी विद्यापीठाची अधिस्वीकृती रद्द केली आहे. परिणामी संशोधन, विस्तार व शिक्षणासाठी दिला जाणारा निधी आयसीआरने थांबवला आहे. आता याच धर्तीवर माफसूचा आढावा घेतला जात असल्याने माफसूच्या कुलगुरुंसह सर्वच जोमाने कामाला लागल्याचे येथील चित्र आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सेवानिवृत्त उप -महाव्यवस्थापक डॉ. व्ही.के. तनेजा यांच्या अध्यक्षतेखाली चार तज्ज्ञांची समिती माफसूचा आढावा घेणार आहे. माफसूंतर्गत राज्यात मुंबई, पुण्यासह दहा पशू विज्ञान महाविद्यालये व संशोधन केंद्रे असून, अकोला येथे स्नातकोत्तर पशू, मत्स्य व विज्ञान संस्था आहे. हरियाणातील हिस्सारनंतर पशूवर संशोधन करणारी देशातील ही दुसºया क्रमांकाची संशोधन संस्था मानली जाते. राज्यातील इतर महाविद्यालयांच्या तपासणीनंतर ही अधिस्वीकृती समिती ९ आॅगस्टला सायंकाळी अकोला येथे येणार आहे. रात्री मुक्काम करू न ९ आॅगस्ट रोजी आढावा घेतला जाईल. ११ ला पुणे, १२ ला मुंबई व १३ आॅगस्ट रोजी मुंबईत यासंदर्भात बैठक होईल.
आयसीआर या विद्यापीठाला विविध संशोधन तसेच शिक्षणासाठी निधी उपलब्ध करू न देते, या निधीचा विनियोग कसा होतो, विद्यार्थ्यांना सोयी, सवलती कशा दिल्या जातात, संशोधनाचा स्तर कसा, माफसूच्या या सर्व बाबींचा सूक्ष्म अभ्यास करू न ही समिती त्यांचा अहवाल आयसीएआरला सादर करणार आहे. पीएच.डी.च्या समस्या आहेत. माफसूच्याही ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. खासगी पशू महाविद्यालयाचा दर्जादेखील सुमार आहे.