शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या'बद्दल मी आजही वचनबद्ध; उद्धव ठाकरेंकडून मोठ्या निर्णयाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 20:31 IST

शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्री आक्रमक; भाजपाचा समाचार

नागपूर: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन सध्या विरोधकांचा गदारोळ सुरू आहे. मात्र आम्हाला आमच्या आश्वासनांची आठवण करुन देऊ नका. आम्हाला स्मृतीभ्रंश झालेला नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज भाजपाला लक्ष्य केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आम्ही वचनबद्ध आहोत, असं म्हणत त्यांनी कर्जमाफीचे संकेत दिले. नागपूरमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. सत्ता आल्यामुळे बदलू नका. आधीच्या सरकारसारखे वागू नका, असा सल्ला उपस्थितांना देत उद्धव ठाकरेंनीभाजपावर निशाणा साधला. आम्हाला आम्ही दिलेली वचनं माहीत आहेत. आमचेच शब्द आमच्यावर फेकू नका. आम्हाला स्मृतीभ्रंश झालेला नाही. पण अच्छे दिन कधी येणार याबद्दल विचारताच बोबडी का वळली होती, असा सवाल ठाकरेंनी विचारला. नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५० दिवसांची मुदत मागितली होती. त्याचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी मोदींवरही शरसंधान साधलं. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपालादेखील मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेची ओळख ठाम आहे. आम्ही कधीही बुरखा घातला नाही. आम्ही हिंदुत्ववादीचं आहोत आणि हिंदुत्ववादीच राहू. युती तुटली म्हणून आम्ही धर्मांतर केलेलं नाही. तुम्ही २०१४ मध्ये युती तोडलीत तेव्हादेखील आम्ही हिंदुत्ववादीच होतो, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी भाजपाला करुन दिली. भाजपा आमदारांनी आज विधानसभेत 'मी पण सावरकर' अशी घोषणा असलेल्या टोप्या घालून प्रवेश करत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावरही उद्धव यांनी भाष्य केलं. अखंड हिंदुस्तान हे सावरकरांचं स्वप्न होतं. त्याचं काय झालं, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान करतात. म्हणजे सरकारला विरोध करणारे सगळे देशद्रोही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंमत असेल तर पाकिस्तानला संपवा. तुमचं धाडस तिथे दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी दिलं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीBJPभाजपाShiv Senaशिवसेना