शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगाकडून कामाला सुरूवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 19:54 IST

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाच्या कामकाजाला बुधवारी पुण्यात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी केवळ एका व्यक्तीची साक्ष नोंदवून घेण्यात आली.

ठळक मुद्देएकाच व्यक्तीची साक्ष घेतली : ६ आॅक्टोबरपर्यंत १७ व्यक्तींची साक्ष नोंदवणारआयोगाच्या कामकाजास मुदतवाढ देण्याची शक्यता

पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाच्या कामकाजाला बुधवारी पुण्यात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी केवळ एका व्यक्तीची साक्ष नोंदवून घेण्यात आली. आयोगाकडून येत्या ६ आॅक्टोबरपर्यंत १७ व्यक्तींची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, त्यास जास्त अवधी लागत असल्याने या कामकाजास मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.  कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग कोरेगाव भिमा प्रकरणी चौकशी करत आहे. आयोगाने मे महिन्यात कोरेगाव भिमा,पेरणे फाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला होता. तसेच विहित मुदतीत सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली असून त्यातील १७ व्यक्तींची साक्ष ३ ते ६ सप्टेबर या कालावधीत नोंदविली जाणार असल्याचे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच त्यासंदर्भातील वेळापत्रकही तयार करण्यात आले होते. त्यानुसार जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये आयोगाला उपलब्ध करून दिलेल्या कार्यालयात अर्ज/प्रतिज्ञापत्रांवर सुनावणी व साक्षी तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.आयोगातर्फे राजेंद्र गायकवाड, संभाजी शिवले, चंद्रकांत पाटील, प्रल्हाद गायकवाड, कृष्णा आरगडे, मुरलीधर देशमुख, रेखा शिवले, शांताराम भंडारे, सोनेश शिवले, शरद दाभाडे, ज्ञानेश्वर देशमुख यांच्यासह कोरेगाव भीमा ग्रामपंचायत सरपंच संगीता कांबळे, माजी उपसरपंच गणेश फडतरे, ग्रामपंचायत लिपिक सागर गव्हाणे, संतोष गायकवाड, बाळासाहेब मिसाळ-पाटील आणि सर्जेराव वाघमारे यांची साक्ष नोदविली जाणार आहे.दरम्यान, बुधवारी आयोगासमोर चंद्रकांत पाटील यांची साक्ष नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. मात्र, बुधवारी कार्यालयीन वेळेत आयोगाचे कामकाज सुरू होते. पाटील यांनी आयोगासमोर इतिहास कालीन माहिती सांगितल्याचे समजते.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारCourtन्यायालयPoliceपोलिस