शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या औषधात कमिशन

By admin | Updated: November 7, 2014 00:51 IST

औषधांची बिले काढण्यासाठी ‘कमिशनखोरी’ करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याची स्वत:हून दखल घेत अकाऊंट विभागातील दोन अधिकाऱ्यांची

अधिकाऱ्यांचे बिंग फुटले : अधिष्ठात्यांची धडक कारवाई नागपूर : औषधांची बिले काढण्यासाठी ‘कमिशनखोरी’ करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याची स्वत:हून दखल घेत अकाऊंट विभागातील दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली. बुधवारी झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.मेडिसीनच्या अकाऊंट विभागातील एक तर नर्सिंग विभागातील एक अधिकारी औषधांची बिले काढण्यासाठी कमिशन घेत असल्याची तक्रार मेडिकलच्या औषध पुरवठादारांनी शासनाच्या औषधी व द्रव्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे केली. म्हैसकर यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर औषधी व द्रव्य विभागाकडून कानउघाडणी केल्यानंतरही अधिकारी कानाडोळा करीत होते. यामुळे पुरवठादार चांगलेच त्रस्त झाले. मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी औषध पुरवठादारांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना संबंधित अधिकाऱ्यांचे ‘कारनामे’ सांगितले. या अधिकाऱ्यांविरूद्ध यापूर्वी अनेक तक्रारी होत्या. मंगळवारी थेट पुरवठादारच तक्रारी घेऊन आल्याने डॉ. निसवाडे यांनी थेट कारवाई करीत त्याच दिवशी एका अधिकाऱ्याची पॅथॉलॉजी विभागात उचलबांगडी केली, तर दुसऱ्या अधिकाऱ्याची रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागात (पीएसएम) करून नर्सिंग विभागाला गैरव्यवहारमुक्त केले. डॉ. निसवाडे यांनी तक्रारीची दखल घेत कारवाई केल्याने बेजबाबदार अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)