शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

सत्तेत आल्यापासून आम्ही १०० टक्के समाजकारणच केले- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 4:57 PM

जेव्हापासून आपण सत्ता हाती घेतली आहे त्यापासून आपण १०० टक्के समाजकारण केले आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबई- शिवसेना ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी होती. जेव्हापासून आपण सत्ता हाती घेतली आहे त्यापासून आपण १०० टक्के समाजकारण केले आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, आपण आपली वचने पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे.पाच दशके आपण जशी लोकांची सेवा केली, तशी पुढेही आपल्याला सेवा करायची आहे. गाव तिथे शाखा हे काम आपल्याला हाती घ्यायचे आहे. 'प्रथम ती' असा कार्यक्रम आपण हाती घेतला होता. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यात आपली शिवसेनेची शाखा असायला पाहिजे आणि त्या शाखेचा आवाज बुलंद करायचा हा प्रयत्न आपला असायला पाहिजे, असा मानसही आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवला आहे. 

तत्पूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शिवसेना हेच  एक वादळ आहे आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचकसुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढले आहे. त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. हिमालयाच्या संकटाला सुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक असतो. आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे.शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही, असंही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही. कोरोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो. शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या त्या आता आपण १०० लॅब केले आहेत आणि  आपण लॅब आणखीन वाढवणार आहोत.

हेही वाचा

चीनसोबतच्या तणावात अमेरिका भारताला देणार दिलासा; GSPचा दर्जा पुन्हा मिळणार?

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे होणार वितरण, प्रथम विजेत्यास ५ लाख मिळणार

राहुल गांधींचा वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा गरजूंना मदतीचा हात

Unlock 1.0:  राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे